मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – धर्मवीर आनंद दिघे यांचे पुतणे आणि शिवसेनेचे नवे ठाणे जिल्हाप्रमुख केदार दिघे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. कारण एका महिलेने त्यांच्याविरोधात धमकावल्याचा गुन्हा दाखल केला आहे. सेंट रेजीस या फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये एका महिला कर्मचाऱ्यावर बलात्कार झाल्याची तक्रार एन.एम. जोशी मार्ग पोलीस ठाण्यात देण्यात आली आहे. शिवसेनेचा मूळ गट आणि बंडखोरांचा गट यामध्ये आधीच मोठा संघर्ष आणि तणाव निर्माण झाल्याने आता आणखी या प्रकरणी काय कारवाई होती याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. राजकीय विरोधकांवर सुड उगवण्याचा प्रकार असल्याचे सांगण्यात येते. त्यातच आता याप्रकरणी धक्कादायक माहिती समोर आली आहे.
याप्रकरणात केदार दिघेंसोबत आणखी एका व्यक्तीचा समावेश असल्याचीही माहिती समोर आली आहे. त्यामुळे राजकारणात पुन्हा उलट सुलट चर्चा सुरू झाल्या आहेत. केदार दिघे यांच्यावर उद्धव ठाकरे यांनी अलीकडेच ठाण्याचे नवे जिल्हा प्रमुख ही मोठी जबाबदारी दिली होती. विविध मुद्द्यांवर ते एकनाथ शिंदे यांनाही घेरण्याचा प्रयत्न करत होते. त्यातच हा गुन्हा दाखल झाल्याने ठाण्यातील राजकारण पुन्हा वेगळे वळण लागण्याची शक्यता आहे.
या प्रकरणात रोहित कपूर या बड्या व्यावसायिकाने हा अत्याचार केल्याचा आरोप पीडित युवतीने केला आहे. तर पैसे घे आणि याची वाच्यता कुठे करु नकोस, नाहीतर सुला संपवू अशी धमकी केदार दिघे यांनी दिल्याचं या तक्रारीत संबंधित युवतीने म्हटलंय. १ ऑगस्ट २०२२ रोजीचा हॉटेलमधील सीसीटीव्ही फुटेजही पोलिसांच्या हाती लागले आहे. त्यात रोहित कपूर आणि केदार दिघे हे दोघे दिसत आहेत. त्यामुळे हे दोघे त्याच दिवशी या हॉटेलमध्ये काय करत होते? असा प्रश्न आता विचारला जात आहे. पोलीस या प्रकरणाची आता सखोल चौकशी करत आहेत.
बलात्कार पीडित महिलेने धमकावल्या प्रकरणी एन. एम. जोशी मार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. रोहित कपूर याने २८ जुलै रोजी लोअर परळच्या सेंट रेजिस या हॉटेलमध्ये एका कर्मचारी तरुणीवर बलात्कार केल्याचा आरोप आहे. आरोपीने पीडितेला धनादेश देण्यासाठी हॉटेलमध्ये बोलावून तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप आहे. तर पीडित तरुणीने तक्रार करु नये म्हणून केदार दिघे यांनी तिला धमकावल्याचा आरोप करण्यात आला आहे. पोलिसांनी दिघे यांच्याविरोधात गुन्हेगारी प्रकरण धमकी तर रोहित कपूरविरोधात कलम ३७६ नुसार बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे.
राज्यात आणि केंद्रात सत्तेचा दुरुपयोग सुरु आहे. विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न हा केला जात आहे. शिवसेनेच्या ठाणे जिल्हाप्रमुख पदी केदार दिघे यांची नियुक्ती होताच त्यांच्यावर बलात्कार पीडितेला धमकावल्याचा आरोप करण्यात आला आहे. केदार दिघे विरोधात ईडीची कारवाई करता येत नसल्याने पोलीस चौकशीची सिसेमिरा लावला जात असल्याचा आरोप शिवसेनेच्या सुषमा अंधारे यांनी केला आहे तर
जिल्हाप्रमुख पदी निवड होताच सदरील महिलेने तक्रार कशी नोंदवली असा सवाल मनिषा कायंदे यांनी उपस्थित केला आहे. त्यामुळे यामागे राजकारण असल्याचे नव्याने सांगायची गरज नाही. पूर्वी लहान मुलांना गब्बर याची भिती दाखवली जात होती आता विराधात बोलणाऱ्यांना भाजपाकडून ईडी ची भिती दाखवली जात असल्याचा आरोप अंधारे यांनी केला आहे.
Shivsena Leader Kedar Dighe Rape case Shocking information