मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी ट्विटरद्वारे एक पत्र शेअर करुन शिवसेनेतील अंतर्गत स्थिती चव्हाट्यावर आणली आहे. शिवसेना पक्ष प्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सेनेचे आमदार भेटूही शकत नसल्याची खदखद या पत्रामध्ये व्यक्त करण्यात आली आहे. तसेच, उद्धव यांच्याभोवतीच्या बडव्यांमुळेच सेनेत बंडखोरी झाल्याचे स्पष्ट नमूद करण्यात आले आहे.
राज्यसभा निवडणुकीतील सेनेचा पराभव, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यामुळे होणारी गोची, अयोध्या दौऱ्यात सेना आमदारांना रोखले गेले यासह अनेक मुद्द्यांवर या पत्रात प्रकाश टाकण्यात आला आहे. मुख्यमंत्र्यांच्या कालच्या भाषणात आमच्या कुठल्याच प्रश्नाचे उत्तर नाही, अशी सलही त्यात व्यक्त करण्यात आली आहे. शिवाय एकनाथ शिंदे हे नेहमी सेना आमदारांशी संपर्कात आणि सर्वांना कसे वेळ देत होते, हेही नमूद केले आहे. सेना आमदार संजय शिरसाट यांचे हे पत्र असून सेनेत बंडखोरी का वाढली, हे यातून स्पष्ट होत आहे.
वाचा हे संपूर्ण पत्र
ही आहे आमदारांची भावना… pic.twitter.com/U6FxBzp1QG
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) June 23, 2022
shivsena leader eknath shinde share this letter to cm uddhav thackeray Maharashtra Political Crisis