मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मध्य प्रदेशप्रमाणे महाराष्ट्रातही ऑपरेशन लोटस यशस्वी करण्याच्या जोरदार हालचाली सुरू झाल्याचे बोलले जात आहे. शिवसेनेत वादळ निर्माण झाले असून नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे हे नाराज असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळेच ते काही आमदारांसह गुजरातमधील सूरत येथे असल्याचे सांगितले जात आहे. जर शिंदे हे भाजपमध्ये गेले तर राज्यात भाजपच्या नेतृत्वातील सरकार स्थापन करण्याच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत. त्यासंदर्भात शिंदे यांना थेट उपमुख्यमंत्री पदाची ऑफर भाजपकडून देण्यात आल्याची जोरदार चर्चा आहे. जर शिंदे यांनी ही ऑफर स्विकारली तर देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील सरकार राज्यामध्ये स्थापन होण्याची चिन्हे आहेत.
ऑपरेशन लोटस अंतर्गत राज्यामध्ये आज दिवसभर काय घडामोडी घडतात याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. आज दुपारी २ वाजता एकनाथ शिंदे यांची पत्रकार परिषद आहे. त्यातच शिवसेनेकडूनही शिंदे यांची मनधरणी सुरू झाली आहे. ज्येष्ठ नेत्यांशी चर्चा करण्याची तयारी शिंदे यांनी दर्शविली आहे. त्यामुळे ते काय निर्णय घेतात यावर सर्व काही अवलंबून असल्याचे सांगितले जात आहे.
shivsena leader eknath shinde bjp dycm offer