औरंगाबाद (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शिवसेना पक्ष प्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची आज येथे भव्य जाहीर सभा होत आहे. शहरातील मराठवाडा संस्कृती मंडळाच्या मैदानावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची सभा झाली होती. आणि त्याच मैदानात आज सायंकाळी ६ वाजता उद्धव यांची सभा होत आहे. उद्धव या सभेत काय बोलतात, कुणाला लक्ष्य करतात याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. तर, या सभेद्वारे जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यासाठी शिवसेनेने कंबर कसली असून संपूर्ण मराठवाड्यातून शिवसैनिक औरंगाबादमध्ये दाखल होत आहेत.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांची औरंगाबाद भव्य सभा झाली. त्यानंतर आता आज उद्धव ठाकरे यांची याच मैदानावर भव्य सभा होत आहे. शिवसेनेसाठीही हे ठिकाण खास आहे, कारण 34 वर्षांपूर्वी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी कट्टर हिंदुत्व कार्ड घेऊन सभा घेतली होती. त्यामुळेच पक्षाने मराठवाड्यात आपला पाया पसरवला होता.
औरंगाबाद शहरातील शिवसेनेच्या पहिल्या शाखेचा 37 व्या वर्धापन दिन मेळावा 8 जून रोजी साजरा केला जाणार आहे. त्यासाठी उद्धव ठाकरे हे औरंगाबादला येणार आहेत. पालकमंत्री आणि शिवसेना नेते सुभाष देसाई म्हणाले की, हा मेळावा भव्य असेल आणि त्यामुळे मैदान छोटे होईल, अशी अनेक शिवसैनिकांची उपस्थिती अपेक्षित आहे. आमच्या पहिल्या शाखेच्या वर्धापनदिनानिमित्त उद्धवजी संभाजी नगर (औरंगाबाद) येथे सभेला संबोधित करतील,”.’
होय… संभाजीनगरच!
मराठवाड्यात सर्वप्रथम स्थापन झालेल्या शिवसेना संभाजीनगर शाखेच्या ३७ व्या वर्धापन दिनी शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे यांची जाहीर सभा.
वेळ:- बुधवार दि. ८ जून २०२२, सायं. ६:०० वाजता
स्थळ:- मराठवाडा सांस्कृतिक मंडळ, संभाजीनगर pic.twitter.com/2Sankqba3M— ShivSena – शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray (@ShivSenaUBT_) June 6, 2022
राज ठाकरे यांनी 1 मे रोजी औरंगाबादमध्ये जाहीर सभा घेतली. याच सभेत त्यांनी राज्य सरकारला भोंग्यांचा अल्टीमेटम दिला. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा पुनरुच्चार करण्यासाठी मनसेने औरंगाबादमध्ये कट्टर हिंदुत्वाचा मुद्दा उपस्थित केला. राज यांच्या सभेला मोठी गर्दीही जमली होती.
मराठवाड्यातील जनतेसाठी उद्धव यांची सभा प्रमुख आकर्षण ठरणार आहे. यासाठीच सेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या जोरदार बैठका सध्या सुरू आहेत. शिवसेनेचा हिंदुत्वाचा अजेंडा आणि महाराष्ट्र विकास आघाडी सरकारच्या विकासावर उद्धव हे बोलणार असल्यायाचे सांगितले जाते. या मेळाव्याला मराठवाड्याच्या सर्व भागातून शिवसैनिक हजेरी लावण्याची अपेक्षा आहे.
शिवसेनेची ताकद मराठवाड्यात असून, शिवसेनेने या भागात आपली पकड कायम ठेवली आहे. येथे 46 विधानसभा मतदारसंघ आहेत. गेल्या महिन्यात, उद्धव ठाकरे यांनी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांसोबत झालेल्या बैठकीत त्यांना नांदेड आणि जालन्यासह मराठवाड्यातील जिल्ह्यांवर लक्ष केंद्रित करण्याचे निर्देश दिले होते. जिथे शिवसेना आपला पाया वाढवू शकते.