मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शिवसेना पक्ष प्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आता शिवसैनिकांशी संवाद साधत आहेत. हिंदुहृदयसम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त ते पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी बोलत आहेत. मानेवरील शस्त्रक्रीयेनंतर ठाकरे हे प्रथमच पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी बोलत आहेत. नजिकच्या काळात राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. यापार्श्वभूमीवर ते काय बोलणार, मुख्यमंत्र्यांच्या आजारपणावरुन विरोधी भाजपने जोरदार टीका केली आहे त्याला ते काय उत्तर देणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. बघा, त्यांच्या भाषणाचे थेट प्रक्षेपण
https://twitter.com/ShivsenaComms/status/1485258963923140608?s=20