मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पक्षातील बंडखोरीनंतर पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंनी आता शिवसेनेची नव्याने पक्षबांधणी सुरु केली आहे. त्याअंतर्गत सोमवारी उद्धव यांनी काही मोठे पाऊल उचलली आहेत. एकीकडे पक्षविरोधी कारवायांचा आरोप करत पक्षाचे ज्येष्ठ नेते रामदास कदम आणि माजी खासदार आनंदराव अडसूळ यांना बाहेरचा रस्ता दाखविण्यात आला आहे. या दोघांची शिंदे गटाने नेते पदी नियुक्ती केली आहे. तत्पूर्वी, सोमवारी उद्धव ठाकरे यांनी एकाच दिवसात १०० नव्या नियुक्त्या केल्या आहेत.
आमदारांच्या बंडानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे पावले टाकत आहेत. उर्वरित पदाधिकाऱ्यांची ते सध्या ओळख पटवत आहेत. याअंतर्गत उद्धव यांनी शिवसेनेच्या दोन ज्येष्ठ नेत्यांविरोधात महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. या निर्णयान्वये उद्धव यांनी रामदास कदम आणि माजी खासदार आनंदराव अडसूळ यांना पक्षातून बाहेरचा रस्ता दाखवला आहे. या दोन्ही नेत्यांवर पक्षविरोधी कारवाया केल्याचा आरोप आहे. कदम यांनी मातोश्रीवर राजीनामा पाठवल्याचे वृत्त आले होते. विशेष म्हणजे रामदास यांचे पुत्र योगेश कदम यांनी यापूर्वीच शिंदे गटात प्रवेश केला आहे.
https://twitter.com/ShivsenaComms/status/1549012343907946497?s=20&t=Wl_FZ7S_X4Gwi2mGB5v8nQ
शिवसेनेचे अस्तित्व वाचवण्याचा प्रश्न उद्धव ठाकरेंसमोर निर्माण होऊ लागला आहे. याअंतर्गत उद्धव पक्षाच्या फेरबदलात व्यस्त आहेत. त्यांच्यासमोर सध्या सर्वात मोठे आव्हान आहे ते म्हणजे मुंबईसह १० महापालिकांच्या निवडणूका. यानंतर २०२४ मध्ये होणाऱ्या सार्वत्रिक विधानसभा निवडणुकांवरही उद्धव यांची नजर आहे. उद्धव यांनी सोमवारीच महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये १०० हून अधिक पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या केल्या आहेत. त्यात मुंबई, पालघर, यवतमाळ, अमरावतीसह इतर अनेक जिल्ह्यांत शंभरहून अधिक पदाधिकाऱ्यांच्या नियुक्तीचा समावेश आहे.
Shivsena Chief Uddhav Thackeray Strict action and new appointments Maharashtra Political Crisis Rebel