गुरूवार, जुलै 3, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

संजय राऊतांना अटक होताच उद्धव ठाकरेंनी घेतला हा मोठा निर्णय

by India Darpan
ऑगस्ट 1, 2022 | 1:41 pm
in संमिश्र वार्ता
0
sanjay raut uddhav thackeray

 

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शिवसेना नेते संजय राऊत यांना ईडीकडून अटक होताच त्याची गंभीर दखल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी घेतली आहे. राऊत यांना अटक होणे म्हणजे उद्धव यांचा एक हात जायबंदी होण्यासारखे असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. शिंदे गटाच्या आव्हानासह पक्षातील फाटाफुट थाबविण्यासाठी उद्धव यांनी कसोशीने प्रयत्न सुरू केले असताना राऊत यांना अटक झाली आहे. त्यामुळेच उद्धव यांनी तातडीने शिवसेनेच्या ज्येष्ठ आणि महत्त्वाच्या नेत्यांची बैठक बोलावली आहे. राऊत यांच्या अटकेनंतर पुढे काय करायचे याबाबतची रणनीती या बैठकीत ठरवण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

शिवसेना नेते संजय राऊत यांना रात्री एकच्या सुमारास अटक करण्यात आली. त्यांच्या भांडूप येथील मैत्री बंगल्यावर काल सकाळी ७ वाजता ईडीने धाड मारली. तब्बल साडेनऊ तासांच्या झाडाझडतीनंतर ईडीने राऊत यांना ताब्यात घेतलं. त्यानंतर राऊत यांची दक्षिण मुंबईतील बॅलार्ड पियर येथील ईडीच्या कार्यालयात चौकशी करण्यात आली. नंतर रात्री १२ वाजून ४० मिनिटांनी राऊतांना अटक केली. गोरेगावच्या पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी राऊत यांना अटक करण्यात आली आहे.

या सगळ्या प्रकरणामुळे शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. राऊत यांच्या अटकेच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी आज ज्येष्ठ नेत्यांची बैठक बोलावली आहे. या बैठकीत पुढे काय करायचे, यावर चर्चा होणार आहे. शिवसेनेच्या इतरही नेत्यांची ईडीकडून चौकशी सुरू आहे. त्यावरही या बैठकीत चर्चा करण्यात येणार असल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी बोलावलेल्या या बैठकीला संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे. संजय राऊत यांना ईडीकडून अटक होणं हा शिवसेनेसाठी मोठा धक्का मानला जात आहे.

शिवसेनेत पडलेली फूट, कोर्टात सुरू असलेले खटले आणि आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राऊत यांना अटक करण्यात आल्याने शिवसेनेत खळबळ उडाली आहे. तसेच राऊत यांना ईडीच्या कोठडीतून बाहेर काढण्यासाठी काय करता येईल, यावरही या बैठकीत चर्चा करण्यात येणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं. शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांवरच ठरवून कारवाई केली जात असल्याने शिवसेनेत संतापाची लाट पसरली आहे.

राऊत यांच्या एकेकाळच्या सहकारी स्वप्ना पाटकर यांनी राऊतांविरोधात वाकोला पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. स्वप्ना पाटकर यांनी वाकोला पोलीस ठाण्यात जबाब नोंदवला आहे. लैंगिक अत्याचार करण्याची आणि जीवे ठार मारण्याची धमकी स्वप्ना पाटकर यांना देण्यात आली होती. त्यामुळे राऊत यांच्या विरोधात भादंवि कलम ५०४, ५०६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे राऊत यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे.

Shivsena Chief Uddhav Thackeray Decision after Sanjay Raut Arrest

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

शिंदे गटाची तातडीने सर्वोच्च न्यायालयात धाव; आता केली ही मागणी

Next Post

‘महाराष्ट्रात शिवसेनाही संपते आहे, एक दिवस देशात फक्त भाजपच राहिल’, भाजप अध्यक्ष नड्डा यांच्या वक्तव्याने खळबळ

India Darpan

Next Post
j p nadda scaled e1659342033971

'महाराष्ट्रात शिवसेनाही संपते आहे, एक दिवस देशात फक्त भाजपच राहिल', भाजप अध्यक्ष नड्डा यांच्या वक्तव्याने खळबळ

ताज्या बातम्या

Rahul Gandhi

३ महिन्यांत महाराष्ट्रात ७६७ शेतकऱ्यांची आत्महत्या, ही आकडेवारी नाही तर उद्ध्वस्त घरे…राहुल गांधी यांची पोस्ट

जुलै 3, 2025
IMG 20250703 WA0179 1

ब्रँडेड एक्सचेंज फेस्टिव्हल… जुने कपडे आणा, नवे ब्रँडेड कपडे न्या !

जुलै 3, 2025
Gu6RydgXEAE8ag e1751527545356

शिवसेना ठाकरे गटाच्या नाशिक महानगर प्रमुखपदी प्रथमेश गीते यांची नियुक्ती…सुनील बागुल यांची हकालपट्टी

जुलै 3, 2025
bjp11

नाशिकमध्ये ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का….या पदाधिका-यांचा भाजपमध्ये प्रवेश

जुलै 3, 2025
Corruption Bribe Lach ACB

आठ हजाराची लाच घेणारे दोन वनपाल एसीबीच्या जाळ्यात

जुलै 3, 2025
cricket

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या विविध समित्यांवर नाशिक जिल्हा क्रिकेटचे सहा जण…

जुलै 3, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011