नागपूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज येथे पत्रकार परिषदेत चक्क शिंदे सरकारचे अभिनंदन केले. त्याचे निमित्त होते ते महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावरुन आज राज्य सरकारने विधिमंडळात केलेल्या ठरावाचे. याप्रश्नी ठाकरे यांनी काल विधिमंडळात प्रश्न उपस्थित केला. जो मराठी भाग सध्या कर्नाटकमध्ये आहे आणि ज्याबद्दल वाद आहे तो केंद्र शासित प्रदेश करावा, अशी मागणी ठाकरे यांनी केली होती. मात्र, त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीत होते. अखेर आज मुख्यमंत्री शिंदे यांनी विधिमंडळात सीमावाद प्रश्नी ठराव एकमताने वाचून दाखविला आणि तो मंजूरही झाला. यासंदर्भात ठाकरे यांनी शिंदे सरकारचे अभिनंदन केले. मात्र, हा भाग केंद्रशासित करण्याचा ठराव आवश्यक होता, असे ते म्हणाले. तसेच, यावरुन ठाकरेंनी शिंदे सरकारवर अशी आगपाखडही केली.
बघा हा व्हिडिओ
https://twitter.com/ShivsenaComms/status/1607672458383065089?s=20&t=M587LFlvcjTZxmdFow_rqA
Shivsena Chief Uddhav Thackeray Congrats Shinde Government
Politics Karnatak Border Dispute