मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्या ‘भारत जोडो’ यात्रेला गेल्या महिन्यात तमिळनाडूतील कन्याकुमारीपासून प्रारंभ झाला आहे. १५० दिवस चालणारी ही यात्रा १२ राज्यांमधून जाणार असून, ३५०० किमी अंतर पार करणार आहे. आता तामिळनाडू कर्नाटक आंध्र प्रदेश या राज्यातून ही भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात पोहोचली असून लवकरच मुंबईत दाखल होणार आहे या यात्रेत भाजप सोडून अन्य पक्षांचे राजकीय नेते देखील सहभागी होणार असल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे देखील भारत जोडले यात्रेत सहभागी होणार का याची चर्चा सुरू झाली आहे.
काँग्रेस नेत्यांचे एक शिष्टमंडळ उद्धव ठाकरे यांना राहुल गांधींच्या ‘भारत जोडो’ यात्रेत सहभागी होण्याचे निमंत्रण देण्यासाठी ‘मातोश्री’वर पोहोचले होते. काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात, एच. के. पाटील आणि अशोक चव्हाण हे उद्धव ठाकरे यांना ‘भारत जोडो’ यात्रेचं निमंत्रण देण्यासाठी ‘मातोश्री’वर गेले, त्यामुळे आता काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेबाबत उद्धव ठाकरे काय निर्णय घेतात, याकडे शिवसेनेचा शिंदे गट आणि भाजपचेही बारीक लक्ष असणार आहे. त्यातच एकीकडे भाजपने मिशन २०२४ ची घोषणा करून आतापासूनच लोकसभेच्या निवडणुकीचे जणू काही तयारी सुरू केली असताना काँग्रेसने देखील भारत जोडो यात्रेच्या निमित्ताने जणू काही या निवडणुकीचे रणशिंगच फुंकले आहे असे म्हटले जाते.
मुंबईतही ही भारत जोडो यात्रा काढण्यात येणार आहे. यात्रा यशस्वी यात्रा यशस्वी करण्यासाठी राज्यातील काँग्रेस नेत्यांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. यात राष्ट्रवादी काँग्रेस सहभागी होणर आहे. शिवाय शेकाप, सीपीआय, सीपीएम आणि जनता दलासह काही स्वयंसेवी संस्थाही सहभागी होणार आहेत. मुख्य म्हणजे या यात्रेला पाठिंबा दर्शविण्यासाठी शिवसेनेकडे प्रस्ताव देण्यात आला आहे. तसेच आगामी मुंबई महापालिका निवडणूक लक्षात घेता या यात्रेच्या माध्यमातून काँग्रेसकडून जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात येणार आहे. ऑगस्ट क्रांती मैदान ते मंत्रालयाशेजारील गांधी पुतळ्यापर्यंत ही यात्रा काढण्यात येणार आहेत.
महत्वाचे म्हणजे आगामी निवडणुका तिन्ही पक्ष महाविकासआघाडी म्हणून लढणार का? हे अजूनही निश्चित झाले नाही. तसेच भाजप आणि शिंदे गटाकडून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेवर हिंदुत्वावरून प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना भारत जोडो यात्रेत सहभागी होणार का नाही, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. राहुल गांधी ‘भारत जोडो’ यात्रेचे नेतृत्व करत आहेत. त्यांच्यासोबत काँग्रेसचे हजारो कार्यकर्ते यात्रेत सहभागी झाले आहेत. ‘भारत जोडो’ यात्रा महाराष्ट्रात दाखल होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे देखील ‘भारत जोडो’ यात्रा महाराष्ट्रात दाखल होताना स्वागतासाठी उपस्थित राहणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
या यात्रेचा समारोप पुढच्या वर्षीच्या सुरुवातीला काश्मीरमध्ये होणार आहे. पक्षाने राहुल यांच्यासह पक्षाच्या ११९ नेत्यांना ‘भारत यात्री’ असे नाव दिले आहे, तर दुसरीकडे मात्र काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या ‘भारत जोडो‘ पदयात्रेवर भाजपचे शाब्दिक हल्ले सुरू झाले आहेत. ‘ ही यात्रा अगदी साधेपणाने करण्यावर भर आहे. भारतातील काँग्रेस पक्ष भारत जोडो यात्रेच्या रूपाने देशव्यापी मुद्दा घेऊन मैदानात उतरत असेल आणि राहुल गांधी सलग पाच महिने पायी चालणार असतील तर निश्चितच काहीतरी नवीन घडेल असा विश्वास काँग्रेस प्रेमी कार्यकर्ते आणि नागरिकांना वाटत आहे.
Shivsena Chief Uddhav Thackeray Bharat Jodo Yatra
Rahul Gandhi