मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शिवसेना पक्ष प्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज राज्यातील जनतेशी आणि खासकरुन शिवसैनिकांशी संवाद साधला. कोरोना झाला असल्याची स्पष्ट कबुली त्यांनी दिली आहे. तसेच, त्यांनी अत्यंत भावनिक आवाहन शिवसैनिकांना केले आहे. त्याचबरोबर ते म्हणाले की, शिवसैनिकांनी मला येऊन सांगावे किंवा प्रत्यक्ष फोन करुन सांगावे, त्यानंतर मी क्षणाचाही विलंब न करता मुख्यमंत्री पद किंवा शिवसेना पक्ष प्रमुख या पदाचा राजीनामा देण्यास तयार आहे. तसेच, आज सायंकाळपासूनच वर्षा हे निवासस्थान सोडून मातोश्री वर रहायला जाईन, असेही त्यांनी जाहीर केले आहे. मुख्यमंत्र्यांचे भाषण ऐकण्याव पाहण्यासाठी खालील व्हिडिओवर क्लिक करा
https://twitter.com/CMOMaharashtra/status/1539580999293554689?s=20&t=u4simUNJ_yj7FDfRTmu6NQ
shivsena chief minister uddhav thackrey 2 major announcements Maharashtra Political crisis