मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – बदलापूरमधील चिमुकलींवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेचा निषेध म्हणून महाराष्ट्र बंदचे महाविकास आघाडीने आवाहन केले होते. मात्र मुंबई उच्च न्यायालयाने न्यायालयाच्या निर्देशानंतर महाविकास आघाडीने महाराष्ट्र बंद मागे घेतला असला तरी काळ्या फिती लावत आंदोलन करणार असल्याचे जाहीर केले. उध्दव ठाकरे यांनी तोंडाला काळी पट्टी बांधून शिवसेना भवनाजवळ आज आंदोलन केले.