नाशिक – मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याविषयी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आक्षेपार्ह विधान केल्यानंतर त्यांच्या विरोधात नाशिकमध्ये गुन्हा दाखल झाला. त्यानंतर शिवसैनिकांनी शालीमार येथील शिवसेना कार्यालयासमोर राणे विरोधात जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन केले. त्यामुळे शहरातील वातावरण चांगलेच तापले आहे. दरम्यान भाजपच्या काही कार्यकर्त्यांनी शिवसेना कार्यालयावरही दगडफेक करण्याचा प्रयत्न केला. पण, त्यांना शिवसैनिकांनी पळून लावल्याचे शिवसेनेच्या पदाधिका-यांनी सांगितले. या ठिकाणी भाजप व शिवसेना कार्यकर्ते आमने -सामने आले. काही काळ गोंधळही झाला. शिवसेनेच्या आंदोलनाचा बघा व्हिडिओ…