मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेला दिवसागणिक दणक्यावर दणके मिळत आहेत. सेनेचे बंडखोर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील सरकारला आझ बहुमत चाचणीला सामोरे जायचे आहे. त्याचपार्श्वभूमीवर उद्धव यांना आणखी एक धक्का बसला आहे. उद्धव यांच्याकडे त्यांचे पुत्र आदित्य यांच्यासह १६ आमदार शिल्लक होते. मात्र, रात्री यातील एक आमदार फुटला आहे. हिंगोलीचे सेना आणदार संतोष बांगर हे आता शिंदे गटात सामील झाले आहेत. काल रात्रीच त्यांनी शिंदे गटाचे आमदार असलेल्या हॉटेलमध्ये प्रवेश केला. विशेष म्हणजे बांगर यांनी काल विधानसभा अध्यक्षांच्या निवडणुकीत शिंदे गटाच्या विरोधात मतदान केले होते. आणि रात्रीतून त्यांनी आता बंडखोरांचा गट आपलेसा केला आहे. परिणामी, आज बहुमत चाचणीवेळी शिवसेनेकडे आदित्य सांच्यासह केवळ १५ आमदार शिल्लक राहिले आहेत.
Shivsena again one MLA Join Rebel group at night