गुरूवार, सप्टेंबर 18, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

सर्वप्रथम १२ आमदार पळून गेले, ते कसं कळलं? आदित्य ठाकरेंनी पहिल्यांदाच उलगडला सर्व घटनाक्रम

by Gautam Sancheti
ऑक्टोबर 22, 2022 | 2:23 pm
in महत्त्वाच्या बातम्या
0
aditya thackeray 2 e1658480643618

 

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात राज्यात मोठं सत्तानाट्य होऊन सत्तांतर झालं. २९ जून रोजी उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला अन् दुसऱ्याच दिवशी संध्याकाळी एकनाथ शिंदेंनी भारतीय जनता पार्टीच्या समर्थनाच्या आधारे मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. मात्र या सर्व सत्तानाट्यादरम्यान उद्धव ठाकरेंनी शिंदेंच्या समर्थनासाठी जाणाऱ्या आमदारांना का नाही थांबवलं असा प्रश्न अनेकदा चर्चेत आला. या प्रश्नाला उद्धव यांचे पुत्र आणि युवासेनेचे नेते आदित्य ठाकरेंनी उत्तर दिलं आहे.

आदित्य ठाकरेंनी आम्ही शिंदेंवर डोळे झाकून विश्वास ठेवण्याची चूक केली असं विधान केलं आहे. याचविषयी पुढे बोलताना त्यांनी बंडखोरांना न रोखण्याच्या निर्णयामध्ये उद्धव ठाकरेंनी नेमकं काय कारण दिलं हे सुद्धा सांगितलं. “बारा लोक गेले तेव्हा मला उद्धवसाहेबांनी सांगितलं की, आदित्य यांच्यामागे आपण पोलीस वगैरे लावून काही उपयोग नाही. स्वत:ला विकलेले हे लोक आज नाहीतर उद्या निघून जाणार आहेत. ते पैशाला विकले गेलेले आहेत,” असं आदित्य ठाकरेंनी एका मुलाखतीत म्हटलं आहे.

ठाकरे पुढे म्हणाले की, यांच्यामागे लागून काय करायचं, यांच्यावर काही दडपण असेल. त्यांनी काही गैर केलं असेल अथवा लोकांबरोबर काही चुकीचं केलं असेल याचं दडपण असेल तर ते निघून जाणारच आहेत. स्वत:ला विकलं असेल तर निघून जाणार आहेत. यांना किती दिवस रोखायचं आणि का म्हणून रोखायचं? आपण काही चुकीचं केलेलं नाही आपण जनतेसमोर जाऊ. आपण जनतेमध्येच आहोत. आपला चेहरा लोकांना ठाऊक आहे,” असंही सांगितल्याचं आदित्य म्हणाले.
तसेच शिंदे गटातील आमदारांना टोला लगावताना आदित्य यांनी, “हे मुखवटे लावून फिरत होते आणि अजून मुखवटे लावून फिरत आहेत. अनेक वेगवेगळी कारणं देतात. हिंदुत्वापासून, काँग्रेस, राष्ट्रवादीपासून निधीपासून सगळी कारणं देत असतात. ते पळून गेले आहेत. आम्ही इथेच आहोत. आता बघू,” असंही म्हटलं.

अशी लागली सत्तांतराची चाहूल
महाविकास आघाडीमधील सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे विधानपरिषदेच्या निवडणुकीचा निकाल लागल्याच्या रात्रीच बंडखोरी करुन सुरतला निघून गेले. १२ आमदारांसहीत शिंदे सुरतला गेल्याची बातमी म्हणून झळकली आणि राज्यात राजकीय भूकंप होणार याची पहिली चाहूल लागली. त्यानंतर अपात्रतेसंदर्भातील आदेश, या आमदारांची समजूत काढण्यासाठी उद्धव ठाकरेंनी पाठवलेली नेते मंडळी, नाराजी नाट्य, गुवाहाटी प्रकरण आणि आठवडाभराच्या आरोप प्रत्यारोपानंतर बंडखोर गटात ४० शिवसेना आमदार आणि १० अपक्ष आमदार सहभागी झाल्याने अल्पमतात आलेलं ठाकरे सरकार पडलं.

Shivsena Aditya Thackeray Rebel MLA Chronology

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

बंद दवाखान्याचे शटर तोडून चोरट्यांनी लॅपटॉप केला लंपास

Next Post

पोलिसात तक्रार दिल्याचा राग; संतप्त दोघांनी कार अडवून चालकास दिली धमकी

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Related Posts

Maha Gov logo 07 1 1024x512 1
राज्य

पुण्यात बेरोजगार युवकांच्या फसवणुकीचे प्रकार वाढले…कामगार आयुक्तांनी केले हे आवाहन

सप्टेंबर 18, 2025
crime1
क्राईम डायरी

घरातील साफ सफाई करणा-या दांम्पत्याने बंगला मालकाच्या साडेसहा लाखाच्या दागिण्यांवर मारला डल्ला

सप्टेंबर 18, 2025
court 1
महत्त्वाच्या बातम्या

हैदराबाद गॅझेटविरोधी याचिका हायकोर्टाने फेटाळली…मराठा समाजाला दिलासा

सप्टेंबर 18, 2025
accident 11
क्राईम डायरी

अज्ञात चारचाकीने दिलेल्या धडकेत ४८ वर्षीय महिला ठार…नाशिक येथील घटना

सप्टेंबर 18, 2025
crime114
क्राईम डायरी

मैत्रिणीशी लग्न केले म्हणून टोळक्याने तरूणाचे अपहरण करुन लुटले…त्र्यंबरोड भागातील घटना

सप्टेंबर 18, 2025
rohit pawar
संमिश्र वार्ता

रोम जळत आहे आणि निरो बासरी वाजवत आहे…रोहित पवार यांची मुख्यमंत्र्यावर टीका

सप्टेंबर 18, 2025
cbi
संमिश्र वार्ता

सीबीआय न्यायालयाने वरिष्ठ पासपोर्ट अधीक्षकांच्या मालमत्ता जप्त करण्याचे दिले आदेश

सप्टेंबर 18, 2025
Untitled 25
महत्त्वाच्या बातम्या

हायड्रोजन बॅाम्ब…राहुल गांधी यांची पत्रकार परिषद…बघा लाईव्ह

सप्टेंबर 18, 2025
Next Post
fir

पोलिसात तक्रार दिल्याचा राग; संतप्त दोघांनी कार अडवून चालकास दिली धमकी

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011