मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शिवसेना पक्षात गेल्या चार महिन्यापूर्वी उभी फूट पडल्यानंतर उद्धव ठाकरे गट आणि एकनाथ शिंदे गट यांच्यामध्ये सतत मोठ्या प्रमाणावर राजकीय युद्ध सुरू आहे. त्यातच उद्धव ठाकरे यांच्याबरोबरच शिवसेना युवानेते आदित्य ठाकरे यांनीही शिंदे गटावर प्रचंड शाब्दिक हल्ला चढविणे सुरू केले आहे. आता तर आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना खुले आव्हानच दिले आहे.
विशेष म्हणजे वेदांता फॉक्सकॉनसह महाराष्ट्राबाहेर गेल्या गेलेल्या प्रकल्पावरून राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. यावरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर टीकेची झोड उठवली आहे. यात उद्धव ठाकरे गट शिंदे गटावर टीका करण्यात आघाडीवर आहे. दरम्यान आदित्य ठाकरे यांनी तर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पुन्हा एकदा खुले आव्हान दिले आहे. इतकेच नव्हे महाराष्ट्रातून जे प्रकल्प बाहेर गेले, त्याविषयी चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री शिंदेंनी प्रसारमाध्यमांसमोर चर्चेला या. दोघेही एकत्र चर्चेला सामोरे जाऊ, असे चॅलेंज आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांना दिले आहे. आदित्य ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत शिंदे सरकारवर अनेक आरोपही केले आहेत. यावर आता मुख्यमंत्री शिंदे काय प्रतिक्रिया देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, आदित्य ठाकरे पुढे म्हणाले की, गेल्या अनेक दिवसात कुठेही उत्तर न देता राज्य सरकारचा कारभार सुरु आहे, काही मंत्री महिलांना अपशब्द काढतात, तरी कारवाई नाही. नुसत्या घोषणा करतात, कायदा सुव्यवस्था रसातळाला गेली आहे, त्यात वेदांता फाॅक्सकाॅन महाराष्ट्रात येणार होता. कमी विकसित क्षेत्रात गेला. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी तो येणार असे सांगितले. त्यावर उपमुख्यमंत्री खोटे बोलले. तसेच मी परत परत प्रकल्पावर बोलणार कारण आज विकासाची राज्याला गरज. मी राजकीय बोललो नाही, परंतु विकासाचे मुद्दे महत्वाचे, महागाई, सामान्य नागरिकांचे विषय यालाच माझे प्राधान्य असेल असेही आदित्य ठाकरे म्हणाले.
वेदांता फॅाक्सकॅान प्रकल्प १००० % महाराष्ट्रातच येणार होता, ह्याचा हा पुरावा
– आदित्यजी ठाकरे (शिवसेना नेते , युवासेनाप्रमुख , आमदार) pic.twitter.com/K0XFD5T7Q0— Shivsena UBT Communication (@ShivsenaUBTComm) November 29, 2022
आम्ही आंदोलन करतो तेव्हा शेमडी पोरे म्हणतात. त्यांच्याविरोधात बोलले लिहिले की, पत्रकारांनाही वाट्टेल ते बोलले जाते, अजून शेती नुकसानीचे पंचनामे झालेले नाहीत. त्यामुळे नुकसानभरपाई पोहचण्याचा प्रश्नच नाही, आमदार आदित्य ठाकरे म्हणाले आहेत.
यावेळी पत्रकार परिषदेत आदित्य ठाकरे यांनी अनिल अग्रवाल यांना लिहिलेले पत्र ही दाखवले. आदित्य ठाकरे पुढे म्हणाले की, आम्ही माहिती अधिकारात माहिती मागितली त्याला एक दीड महिना लागला. तो आपल्याकडे येणार याचा आज पुरावा देणार आहे , हे पत्र आल्याचे मी सांगत होतो. पण ते माझ्या हातात नव्हते.
ठाकरे पुढे म्हणाले, काल आमच्या सरकारला तीन वर्ष झाली असती. या काळात आम्ही कोट्यावधींचे प्रकल्प आणलेत. मात्र आज त्याचे श्रेय दुसरेच लाटत आहेत. हे खोके सरकार नको त्या गोष्टींच्या मागे धावत आहे. शिंदे सरकार कधी ना कधी महाराष्ट्रासाठी काम करणार आहे की नाही? असे आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे.
Shivsena Aditya Thackeray open Challenge to CM Eknath Shinde