मनमाड (इंडिया दर्पण वृत्तसेा) – गद्दारांची लायकी नाही, त्यांच्या प्रश्नाला उत्तर देणार नाही, अशा परखड शब्दात युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी बंडखोर आमदार सुहास कांदे यांना फटकारले. मनमाड येथे शिवसंवाद यात्रेत ठाकरे बोलत होते. ठाकरे यांच्या यात्रेला मोठा प्रतिसाद मिळाला. ठाकरे यांनी कांदे यांच्यासह सर्व बंडखोरांवर जोरदार आसूड ओढले.
ठाकरे म्हणाले की, गुंडगिरीचा काळ गेला, गुंडगिरी सोडा, समाजसेवा करा, लोकांची सेवा करा, लोक तुम्हालाही डोक्यावर घेऊन नाचतील, मात्र अशा पद्धतीने लोकांना फसवत राहिलात, वागत राहिलात तर हेच लोक तुम्हाला गाडतील असेही ते कांदे यांचा नाव न घेता म्हणाले. हे सरकार अल्पायुषी व तात्पुरते आहे. ते लवकरच कोसळणार आहे. बंडखोर आमदार हे आपल्या नजेरला नजर मिळू शकत नव्हते. माझ्या चेहऱ्यावर आज स्वाभिमान, अभिमान आहे कारण मी विकलो गेलो नाही, अशीही टीका त्यांनी केली.
मनमाडच्या दौ-यात आमदार सुहास कांदे यांनी दहा हजार शिवसैनिकांसोबत आदित्य ठाकरे याना भेटण्याचे आव्हान दिल्यामुळे या दौ-याकडे सर्वांचे लक्ष होते. त्यामुळे आदित्य ठाकरे या यात्रेत काय बोललात हे महत्त्वाचे होते. या शिवसंवाद यात्रेत आदित्य ठाकरेंनी यांनी काही प्रश्न उपस्थितीत केले. यावेळी त्यांनी शिवसैनिकांना विचारले हे राजकारण तुम्हाला पटणार आहे का ? असा सवाल केला. यावर मनमाडच्या शिवसैनिकांनी नाही शब्दात जोरदार घोषणाबाजी केली. याचबरोबर चांगला मुख्यमंत्री असताना बंडखोरांनी असे का केसे असा सवालही यावेळी त्यांनी उपस्थित केला.
यावेळी त्यांनी ‘माझा विश्वास माझा उद्धव’ हे सर्वांपर्यंत पोहचवायचे, पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या बांधणीसाठी रस्त्यावर उतरायचे आहे. यासाठी तुमच्या सगळ्याची साथ हवी आहे. नवा महारष्ट्र घडविण्यासाठी तुमचे प्रेम आणि आशीर्वाद असू द्या असे आवाहन यावेळी उपस्थित शिवसैनिकांना आदित्य यांनी केले.
बघा ठाकरे यांच्या मेळाव्याचा हा व्हिडिओ
https://twitter.com/ShivSena/status/1550381412087316486?s=20&t=0fxO5tmkndN8ASgRpTNKBg
Shivsena Aditya Thackeray Critics on Rebel MLA Suhas Kande