निफाड (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सध्याचे विश्वासघातकी सरकार वरून जनतेचा विश्वास उडाला आहे. शेती व्यवसाय कोलमडला आहे. उद्योग क्षेत्रात निराशा आहे. युवक बेरोजगार झाला आहे. फक्त खोटी आश्वासने देण्यापलिकङे ठोस काही करत नाही. अस्थिर असणा-या या सरकारमुळे महाराष्ट्र राज्य अधोगतीला गेले आहे. निवडणुकांमध्ये हीच जनता त्यांना घरचा रस्ता दाखवल्या शिवाय राहणार नाही, असे प्रतिपादन युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी चांदोरी (ता.निफाड)येथे केले.
ते निफाङ तालुका शिवसेना व युवा सेना आयोजित शेतकरी व युवासंवाद मेळाव्यात बोलत होते. व्यासपिठावर विरोधी पक्षनेते आंबादास दानवे, माजी आमदार अनिल कदम, आ.नरेद्र दराडे, कुणाल दराडे, उपनेते सुनिल बागुल, युवासेना समन्वयक नीलेश गवळी, समीर बोडके, तालुकाप्रमुख सुधीर कराड, गोकुळ गिते, युवासेना जिल्हाप्रमुख विक्रम रंधवे, जि प सदस्य दिपक शिरसाठ, आशिष शिंदे, सुलभाताई पवार, चांदोरी सरपंच विनायक खरात, संदीप टरले, शरद नाठे, गोपाळनाना बोडके, खंडू बोडके-पाटील, महिला आघाडीच्या भारती जाधव, सोनाली भोगे आदी मान्यवर उपस्थित होते. प्रारंभी पुतळापूजन करण्यात आले. तत्पुर्वी बैलगाडीमधे युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे व अनिल कदम यांची ढोल ताशांच्या गजरात भव्य मिरवणूक काढण्यात आली.
यावेळी पुढे बोलतांना आदित्य ठाकरे म्हणाले की, मी जनतेशी संवाद करत महाराष्ट्र फिरतोय. लोकांशी बोलतांना लक्षात येतं की, जे कट्टर शिवसैनिक आहे ते उध्दवजी ठाकरे यांच्या सोबतच आहे. तसेच जनतेचा महाविकास आघाडीकडे कल वाढतोय. सध्या राज्यात गलिच्छ राजकारण चालंलय. आणि या राजकारणामुळे जनता संतप्त आहे. गद्दार फुटले तेव्हा गुजरातला गेले. त्याचीच परतफेड म्हणून या गद्दरांनी गुजरातला उद्योग भेट दिले. महाराष्ट्रात उद्योग आले असते तर एक लाख युवकांना रोजगार मिळाला असता परंतु महाराष्ट्राचं वाटोळं करण्याचं काम या गद्दारानी केलं त्यांना जनता माफ करणार नाही. ठाकरे पुढे म्हणाले की, माझा वरळीतील विजय आजच निश्चित झाला आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री वरळीत लक्ष देतात. सभा घेतात, यावरून त्यांचा पराभव त्यांना स्पष्ट दिसतो आहे. माझ्यासारखा ३४ वर्षाच्या युवकाला पाडण्यासाठी संपूर्ण गद्दार एकत्र येतात या वरून त्यांना पराभव दिसतो आहे. मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आव्हान देतो की, त्यांनी राजीनामा द्यावा. मी त्यांच्याविरुद्ध निवडणूक लढवतो. हिम्मत असेल तर द्या राजीनामा आणि या मैदानात, असे खुले आव्हान ठाकरे यांनी दिले.
#शिवसंवाद । शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख, आमदार मा. श्री. आदित्यजी ठाकरे यांचा निष्ठावंत शिवसैनिकांशी संवाद । निफाड – #LIVE @AUThackeray #निष्ठावंतशिवसैनिक #निफाड
? TUESDAY – 0️⃣7️⃣ FEBRUARY 2️⃣0️⃣2️⃣3️⃣ ? https://t.co/nVJhFgprFH
— ShivSena – शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray (@ShivSenaUBT_) February 7, 2023
विरोधी पक्षनेते आंबादास दानवे म्हणाले की, आदित्य ठाकरे जनतेशी संवाद करत आहे. लोकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. म्हणून विद्यमान सरकारचा तळतळाट होत आहे. हे सरकार आंधळं बहिरं आणि मुकं आहे. त्यामुळे या सरकारला जनतेच्या समस्या दिसत नाही. निर्यात शुल्क वाढीमुळे द्राक्ष उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे. अतिवृष्टीची मदत मिळतांना दिसत नाही. त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे. तो आक्रोश करतोय पण त्यांच्याकडे लक्ष दिले जात नाही. येणाऱ्या काळात जनताच सरकारला वठणीवर आणेल, असा घणाघात त्यांनी केला.
माजी आमदार अनिल कदम यांनीही यावेळी मनोगत व्यक्त करताना सडकून टीका करत निफाड मतदार संघातही शेतकऱ्यांच्या समस्या वाढल्या असून जिल्हा बँकेच्या ओटीएस योजना व द्राक्ष उत्पादकांच्या समस्येबाबत आदित्य ठाकरे यांचे लक्ष वेधले. यावेळी उपसरपंच मोनिका टर्ले, शहाजी राजोळे, राजेश पाटील, शरद कुटे ,आशपाक शेख, खंडू बोडके-पाटील, भाऊसाहेब कमानकर, संदीप आबा गडाख, सागर जाधव, दत्तू भुसारे यांच्यासह निफाड तालुक्यातील शिवसैनिक व युवासैनिक उपस्थित होते. सूत्रसंचालन सुहास सुरळीकर यांनी केले. प्रास्ताविक संदीप टरले यांनी तर आभार खंडू बोडके पाटील यांनी मानले.
Shivsena Aditya Thackeray Critic Shinde Group