मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शिवसेना शिंदे गटाने आपली विधानसभा निवडणुकीसाठी तिसरी १५ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे.पहिली यादी ४५ उमेदवारांची होती. दुसरी २० उमेदवारांची यादी होती. त्यानंतर तिसरी यादी १५ उमेदवारांची जाहीर केली. आता तिन्ही यादी मिळून एकुण ८० उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. या तिस-या यादीत कन्नडमधून रावसाहेब दानवे यांची कन्या संजना जाधव, मुंबादेवी मतदार संघातून शायना एनसी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर संगमनेरमधून काँग्रेसचे बाळासाहेब थोरात यांच्या विरोधात अमोल खताळ यांना रिंगणात उतवरण्यात आले आहे. तर हातकणंदले व शिरोळ या दोन जागा मित्रपक्षाला देण्यात आल्या आहे.