मालेगाव (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिक जिल्हयातील भाजपा नेते डॉ.अद्वय हिरे यांचा आज मुबंई येथे सेना भवनात कार्यकर्त्यांसह शिवसेना ठाकरे गटात पक्ष प्रवेश होणार आहे. त्यासाठी असंख्य कार्यकर्त्यांसह गाड्यांचा ताफा मालेगावातून मुंबईच्या दिशेने निघाला आहे. ठाकरे गटाला उभारी देण्यासाठी तर मालेगाव मधून पालकमंत्री दादा भुसे यांना शह देण्यासाठी हिरे यांचा शिवसेना ठाकरे गटातील पक्ष प्रवेश महत्वाचा मानला जात आहे.