इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने प्रथमेश गीते यांची नाशिक महानगर प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तर पक्ष विरोधी कारवाया केल्या बद्दल उपनेते सुनील बागुल यांची शिवसेना ठाकरे गटातून हकालपट्टी करण्यात आली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने ही कारवाई करण्यात आली आहे.
आज नाशिकमध्ये शिवसेना ठाकरे गटाला पुन्हा हादरा बसला आहे. सुधाकर बडगुजर, विलास शिंदे यांच्यानंतर नाशिकमधील तीन माजी नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला. तर काही पदाधिका-यांना भाजपमध्ये प्रवेश देण्याला ब्रेक लागला. त्यात नवनिर्वाचित शिवसेना महानगरप्रमुख मामा राजवाडे, उपनेते सुनील बागुल यांच्यासह काही पदाधिका-यांचा प्रवेश सोहळा लांबणीवर पडला आहे.
भाजपच्या आज प्रवेश सोहळा होण्याअगोदर ठाकरे गटाचे खा. संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे, भारतीय जमवा जमव पार्टी ची कमाल आहे. नाशिक मध्ये शिवसेना पदाधीका-यांवर आधी खोटे गुन्हे दाखल केले. हे सर्व पदाधिकारी अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात गेले. पोलिस अटक करतील म्हणून हे सगळे जण फरार झाले. क्लायमॅक्स असा की, हे सगळे फरार ( भाजपा साठी गुन्हेगार) आज भाजपात प्रवेश करत आहेत! जमवा जमव पार्टीने महाराष्ट्राची वाट लावली आहे, सत्ता पैसा दहशत! दुसरे काही नाही! राऊत यांच्या या वक्तव्यानंतर काही पदाधिका-यांना भाजपमध्ये प्रवेश देण्याला ब्रेक लागला आहे. त्यात नवनिर्वाचित शिवसेना महानगरप्रमुख मामा राजवाडे, उपनेते सुनील बागुल यांच्यासह काही पदाधिका-यांचा प्रवेश सोहळा लांबणीवर पडला आहे.
पण, आजच्या प्रवेश सोहळ्यात तीन माजी नगरसेवकांनी मात्र प्रवेश केला. तो भाजपसाठी मोठा धक्का आहे. या धक्क्यानंतर शिवसेना ठाकरे गटाने काही क्षणात नाशिक महानगरप्रमुखपदी प्रथमेश गीते यांची नियुक्ती केली. गीते हे माजी उपमहापौर असून ते माजी आमदार वसंत गीते यांचे चिरंजीव आहे.