शनिवार, ऑगस्ट 2, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

विलास शिंदे यांच्यासह सात माजी नगरसेवकांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश…

by Gautam Sancheti
जून 29, 2025 | 7:00 pm
in महत्त्वाच्या बातम्या
0
Untitled 86

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
शिवसेना ठाकरे गटाचे नाशिक जिल्ह्यातील माजी महानगरप्रमुख विलास शिंदे यांच्यासह नाशिक महानगरपालिकेतील सात नगरसेवक, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्यांनी आज शिवसेना शिंदे गटात जाहीर प्रवेश केला. यावेळी या सर्वांचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पक्षात स्वागत करून त्यांना भावी सामाजिक आणि राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

यावेळी त्यांच्यासह नाशिक मनपातील माजी नगरसेवक संतोष गायकवाड, नयना गांगुर्डे, विष्णुपंत बेंडकुळे, प्रवीण पाळदे, पल्लवी पाटील, निलेश ठाकरे, उषाताई शेळके यांनी शिवसेनेत प्रवेश केला. तर उबाठा गटाचे उप महानगरप्रमुख निवृत्ती इंगोले, जिल्हा परिषद सदस्य सोमनाथ फडोळ, राष्ट्रवादी काँग्रेस तालुका अध्यक्ष मोहनीश दोंदे, उबाठा युवासेना तालुका अध्यक्ष सुनील मते, त्र्यंबकेश्वरचे सभापती खंडू भोये, सरपंच रमेश भोये, दिलीप चौधरी, इगतपुरीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष दशरथ धांडे, राजेश मोरे, नितीन भागवत, दयाराम आहेर, संकेत सातभाई, सचिन कर्डीले यांच्यासह असंख्य पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश केला.

यावेळी शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे, खासदार नरेश म्हस्के, शिवसेना सचिव राम रेपाळे, शिवसेना उत्तर महाराष्ट्र सचिव भाऊसाहेब चौधरी, माजी खासदार हेमंत गोडसे, किशोर अप्पा करंजकर, जिल्हाप्रमुख भाऊलाल तांबाडे, महानगरप्रमुख प्रवीण तिदमे तसेच शिवसेना पदाधिकारी आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या प्रवेश सोहळ्यात एकनाथ शिंदे म्हणाले की, विलास शिंदे यांच्या घरातील लग्नसोहळ्याला मी गेलो तेव्हापासून मला त्यांचा पक्षप्रवेश कधी होणार असा प्रश्न प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी विचारत होते. मात्र त्यांनी आजचा दिवस निवडला. आज त्यांच्यासह त्यांच्या असंख्य पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केल्याने नाशिक महानगरपालिकेवर शिवसेनेचा भगवा नक्की फडकेल अशी खात्री वाटत असल्याचे मत याप्रसंगी व्यक्त केले.

आज त्यांचा पक्षप्रवेश होत असताना काहींनी कोण विलास शिंदे असा प्रश्न विचारला..? अयोध्येत जाताना त्यांना सोबत विलास शिंदे हवा होता, निवडणुकीत काम करताना विलास शिंदे हवा होता, वारंवार आपल्याला एकत्र काम करायचे आहे असं त्यांना सांगितले जात होते. मात्र आता पक्षप्रवेश करणार हे निश्चित झाल्यावर कोण विलास शिंदे..? असा प्रश्न विचारला जात आहे. असेच धोरण राहिले तर एक दिवस तुम्ही कोण..? असा प्रश्न लोकं विचारल्याशिवाय राहणार नाहीत असे ठासून सांगितले. काही जण ‘कम ऑन किल मी’.. म्हणत आहेत मात्र त्यांची अवस्था आज ‘शोले’ सिनेमातील आसरानीसारखी झाली आहे. त्यामुळे जेव्हा ते प्रत्यक्ष मैदानात लढायला उतरतील तेव्हा मागे कुणी राहील की नाही ते सांगता येत नाही. प्रत्येक दिवशी होणारी गळती थांबवायची कशी असा प्रश्न उबाठा यांना पडला आहे. त्यामुळे ज्यांना संपलेला पक्ष म्हणत होते त्यांना अगतिक होऊन युतीसाठी प्रस्ताव पाठवत आहेत.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

दिवसभर इंग्रजी बोलतात आणि रात्री इंग्रजी पितात..भाजप आमदारांची ठाकरे बंधूंवर टीका

Next Post

नाशिक जिल्ह्यात १ जुलैपासून कॅन्सर शोध मोहीम; सुसज्ज मोबाइल व्हॅनद्वारे मोफत तपासणी…

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Next Post
Untitled 87

नाशिक जिल्ह्यात १ जुलैपासून कॅन्सर शोध मोहीम; सुसज्ज मोबाइल व्हॅनद्वारे मोफत तपासणी…

ताज्या बातम्या

rape

घरात कुणी नसल्याची संधी साधत अल्पवयीन मुलीचा विनयभंग…गुन्हा दाखल

ऑगस्ट 2, 2025
Untitled 1

उत्तर महाराष्ट्रातील पहिली सातपुडा जंगल सफारी सुरु; पालकमंत्र्यांनी सफारीचे दोन तिकीट केले बुक

ऑगस्ट 2, 2025
crime112

मोटारसायकल चोरीचे सत्र सुरूच….वेगवेगळया भागातून चार मोटारसायकली चोरीला

ऑगस्ट 2, 2025
facebook insta

सोशल मिडीयावर सक्रिय राहणे एका ६० वर्षीय वृध्देस पडले चांगलेच महाग…फेसबुक मित्राने अशी केली फसवणूक

ऑगस्ट 2, 2025
jail11

९ कोटी रुपयांचे बनावट इनपुट टॅक्स क्रेडिट मिळवणाऱ्या दोन व्यक्तींना अटक…मुंबई विभागाची कारवाई

ऑगस्ट 2, 2025
Maha Gov logo 07 1 1024x512 1

राज्यातील शाळांमध्ये अन्न विषबाधा टाळण्यासाठी नवीन मानक कार्यपद्धती जाहीर…

ऑगस्ट 2, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011