इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
नाशिक शिवसेना ठाकरे गटाचे महानगरप्रमुख विलास शिंदे यांची तडकाफडकी हकालपट्टी करण्यात आली. त्यांच्या जागेवर महानगरप्रमुखपदाची जबाबदारी मामा राजवाडे यांच्याकडे देण्यात आले. शिंदे यांनी शिवसेना शिंदे गटात जाण्याचे संकेत दिल्यानंतर ही कारवाई करण्यात आली.
याअगोदर शिवसेना ठाकरे गटातून बबनराव घोलप, सुधाकर बडगुजर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर विलास शिंदे यांची हकालपट्टी करण्यात आली आहे. त्यामुळे शिवसेना ठाकरे गटाला मोठी गळती नाशिकमध्ये लागली आहे.
राजवाडे यांची नियुक्ती होताच त्यांनी पक्षाने माझे ग्राऊंडवरील काम पाहून माझ्यावर जबाबदारी दिली आहे. पक्ष सोडून जाणारे स्वार्थासाठी पक्ष सोडत आहे. कोणताही पक्ष संपत नसतो. पक्षातील नाराजांची नाराजी मी नक्की दूर करेन. पक्षाने दिलेली जबाबादारी पूर्णपणे पार पाडणार आहे. नाशिक महापालिकेवर मशाल हाती घेऊन भगवा फडकवू असेही त्यांनी सांगितले.
दरम्यान विलास शिंदे हे रविवारी सात ते आठ माजी नगरसेवकांसह एकनाथ शिंदे यांच्या गटात प्रवेश करणार आहे. ते सकाळी मुंबईच्या दिेशने रवाना झाले.