इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
ठाकरे गटाने हकालपट्टी केलेले सुधाकर बडगुजर यांचा मुंबई बाँम्बस्फोटातील दहशतवादी सलीम कुत्ताशी संबंध असल्याचे आरोप आहेत. स्व. हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आज हयात असते तर त्यांनीही बडगुजर यांना शिवसेनेत ठेवलेच नसते. त्यामुळे, त्यांना शिवसेनेत प्रवेश देण्यास सर्व शिवसैनिकांचा विरोधच राहील असे शिवसेना शिंदे गटाचे महानगरप्रमुख प्रविण (बंटी) तिदमे यांनी सांगितले.
ते म्हणाले की, सुधाकर बडगुजर यांनी महायुती विरोधात गरळ ओकली होती. कुंभमेळा लक्षात घेऊन ठेकेदारी साठीच त्यांना सत्तेत सहभाग हवा असल्याचे आरोपही प्रसिद्ध झाले आहेत. शिवसेनेत जनसामान्यांना सोबत घेऊन वाटचाल करणे वंदनीय बाळासाहेबांना आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांना अपेक्षित होते. त्यांच्या शिकवणीतून शिवसेनेचा झेंडा घेऊन सामाजिक कार्यात उतरणाऱ्यांना शिवसेनेची दारे नेहमीच उघडी आहेत. मात्र, बाळासाहेबांच्या विचारांशी प्रतारणा करणाऱ्यांना शिवसेनेत प्रवेश देण्यास शिवसैनिकांचा विरोधच राहील असे तिदमे यांनी सांगितले.