नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली नाशिकमधील गोविंदनगर येथे निर्धार शिबीर पार पडले. शिवसैनिकांचा उत्साह आणि जिंकण्याचा निर्धार घेऊन पुढची वाटचाल करायचीय, असे मत यावेळी उद्धव ठाकरे यांनी मांडले. महाराष्ट्राची जी दुर्दशा झाली आहे, त्या दुर्दशेला बाजूला सारून महाराष्ट्राला प्रगतीपथावर नेण्यासाठी एकजुटीने काम करूया, या निर्धाराने शिबिराची सांगता झाली.
या शिबिरास शिवसेना नेते, उपनेते, खासदार, आमदार, शिवसेना-युवासेना पदाधिकारी तसेच शिवसैनिक उपस्थित होते.