इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
विडंबनात्मक गाण्याव्दारे एकनाथ शिंदे यांचे नाव न घेता केलेल्या टिपण्णीमुळे कुणाल कामरावर शिंदे गटाचे शिवसैनिक चांगलेच भडकले. काल रात्री मुंबईतील हॅाटेलमध्ये जाऊन कामगाराच्या शोच्या सेटची तोडफोड करुन त्यांनी नासधूसही केली. त्यानंतर आज या तोडफोडीप्रकरणी खार पोलिसांनी ११ शिवसैनिकांना अटक केली.
खासदार संजय राऊत यांनी या घटनेनंतर सोशल मीडियात कुणालचा व्हिडिओ पोस्ट केला. त्यात म्हटले की, कुनाल कामरा एक जानेमाने लेखक और स्टँडप कॉमेडियन है…कुणालने महाराष्ट्रकी राजनीती पर एक व्यंगात्मक गाना लिखा तो शिंदे गैंग को मिरची लगी. उनके लोगोने कामराका स्टूडियो तोड दिया. देवेंद्रजी, आप कमजोर गृहमंत्री हो!
या गाण्यावर प्रतिक्रिया देतांना माजी खासदार संजय निरुपम यांनी सांगितले की, कामराने जे केलं, ते व्यंग नाही. हा गंभीर आरोप आहे. तुम्ही आमच्या नेत्याला म्हणता गद्दार आहात. शिवसेनेत काय होतं हे माहित आहे का, गद्दारीचा अर्थ तुम्हाला माहित आहे का, २०२२ मध्ये शिंदेच्या नेतृत्वात ४० पेक्षा अधिक आमदारांनी बंडखोरी केली. ती गद्दीर नव्हती शिवसेनेला करेक्ट डायरेक्शनला आणण्यााच तो प्रयत्न होता असे निरुपम म्हणाले.