इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
महाराष्ट्रात इव्हीएमच्या माध्यमातून प्रचंड बहुमताची सत्ता मिळवली, तरी सत्ताधाऱ्यांच्या कुरघोड्या कमी होत नाहीयत. जनहित साधायचं सोडून, सोशल मीडियाद्वारे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचा अपप्रचार, पक्षाच्या विचारसरणीला वाईट दाखवण्याचा प्रयत्न केला जातोय. फेसबुक आणि इन्स्टाग्रामवरील ‘फशिव सेना’ ह्या पेजवरून पक्षातील नेत्यांचे फोटो, व्हिडीओ मॉर्फ करून समाजात धार्मिक तेढ निर्माण करणारी माहिती शेअर केली जातेय. ह्याविरोधात आज शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) सचिव साईनाथ दुर्गे ह्यांनी सायबर गुन्हे शाखेच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांची भेट घेऊन, लेखी स्वरूपात तक्रार केली.
अशी बदनामीकारक, चुकीची माहिती पसरविणाऱ्या ह्या सोशल मिडिया पेजवर बंदी घालून, पेज चालविणाऱ्यांवर त्वरित कारवाई करावी, अशी मागणी ह्या तक्रारीत केली.