इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
शिवसेना मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत सोमवारी राष्ट्रीय काँग्रेस पक्षातील पुण्यातील कसबा पेठ विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार रविंद्र धंगेकर यांनी मुक्तागिरी बंगला येथे शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला.
रविंद्र धंगेकर यांना पुण्यातील लोकप्रिय नेते म्हणून ओळखले जाते. आपल्या कामातून वेगळी ओळख निर्माण करत त्यांनी लोकसेवक काय असतो, हे दाखवून दिले आहे. आता शिवसेनेत आला आहात. त्यामुळे सगळ्यांना कळेल ‘हु इज धंगेकर’ ? असे म्हणत उपमुख्यमंत्री शिंदे यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले.
यावेळी धंगेकर यांच्या कार्यकर्त्यांनीही शिवसेनेचा भगवा हाती घेत पक्षप्रवेश केला. या सर्वांचे उपमुख्यमंत्री यांनी पक्षात स्वागत करून त्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.