इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले मतदारसंघातील शिवसेना ठाकरे गटाचे माजी आमदार डॉ.सुजित मिणचेकर तसेच मनसेचे हातकणंगले जिल्हाप्रमुख गजानन जाधव यांनी आज शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. यावेळी त्यांचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पक्षात स्वागत करून त्यांच्या भावी सामाजिक आणि राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. त्यांच्या प्रवेशामुळे कोल्हापूर जिल्ह्यात शिवसेनेला अधिक बळकटी मिळणार असल्याचे मत याप्रसंगी व्यक्त केले.
यावेळी खासदार धैर्यशील माने, खासदार डॉ.श्रीकांत शिंदे, जिल्हाप्रमुख रवींद्र माने आणि हातकणंगले विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेचे सर्व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
गेल्या काही दिवसांपासून ठाकरे गटाला मोठे धक्के बसत आहेत. विधानसभा निवडणुकीनंतर प्रत्येक जिल्ह्यातून ठाकरे गटाला सोडचिठ्ठी देत कार्यकर्ते नेते हे शिंदे गटात प्रवेश करत आहे.
https://twitter.com/mieknathshinde/status/1895037840620236930