मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शिवसेनेचे मुख्यनेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे साहेबांची भेट घेऊन सातपूर परिसरातील उबाठा गटाचे माजी नगरसेवक मधुकर जाधव आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहर संघटक बाजीराव दातीर यांनी रविवारी मुंबईत शिवसेनेत प्रवेश केला.
सातपूर परिसरातील माजी नगरसेवक तथा बांधकाम व्यावसायिक मधुकर जाधव आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहर संघटक बाजीराव दातीर यांनी शिवसेनेचे मुख्यनेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे साहेबांची भेट घेऊन शिवसेना पक्षात प्रवेश केला.
यावेळी, शिवसेना सचिव भाऊसाहेब चौधरी, शिवसेना उपनेते विजय (अप्पा) करंजकर, सहसंपर्क प्रमुख राजू (अण्णा) लवटे, शिवसेना महानगरप्रमुख प्रविण (बंटी) तिदमे, माजी नगरसेवक भागवत आरोटे, माजी नगरसेविका हर्षदा गायकर आणि मान्यवर उपस्थित होते.