मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची येत्या १४ मे रोजी जाहीर सभा होणार आहे. शिवसंपर्क अभियानाअंतर्गत होणाऱ्या या सभेची जय्यत तयारी सेनेच्यावतीने सुरू झाली आहे. बीकेसी मैदानावर सायंकाळी ७ वाजता होणाऱ्या या सभेविषयी कालच उद्धव यांनी भाष्य केले होते. माझ्या मनातलं मी आपल्याशी बोलणार आहे आणि अनेकांचा समाचार घेणार आहे, अनेकांचे मास्कही उतरविणार आहे, असे उद्धव यांनी म्हटले आहे. आता सेनेने या सभेचा पहिला व्हिडिओ जारी केला आहे. खऱ्या हिंदुत्वाचा हुंकार ऐकायला यायलाच पाहिजे, अशी टॅगलाईन या सभेसाठी देण्यात आली आहे.
अनेक महिन्यांनंतर उद्धव यांची जाहीर सभा होणार आहे. कोरोनाच्या संकटामुळे जाहीर कार्यक्रम होऊ शकले नाहीत. त्यानंतर उद्दव यांच्या मानेवर शस्त्रक्रीया करण्यात आली. त्यामुळे गेल्या अनेक महिन्यांपासून ते सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये फारसे येत नाहीत. मात्र आता प्रकृती बरी झाल्याने १४ मे पासून ते जाहीर सभांचा धडाका सुरू करणार आहेत. तसेच, संपूर्ण महाराष्ट्र मी पिंजून काढणार आहे, असेही त्यांनी सूचित केले आहे. त्यातच राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाही होणार आहेत. त्यामुळेही सेनेने जय्यत तयारी सुरू केली आहे.
उद्धव यांच्या १४ मेच्या सभेचा बघा हा पहिला व्हिडिओ
शिवसंपर्क अभियान..
दिनांक: १४ मे २०२२ | सायं.- ७.०० वाजता
स्थळ : बीकेसी मैदान, मुंबई pic.twitter.com/WJG687Equn— ShivSena – शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray (@ShivSenaUBT_) May 8, 2022