मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शिवसेनेच्या गटनेतेपदी एकनाथ शिंदे यांची निवड करण्यात आली. रविवारी रात्री विधिमंडळ पक्षाच्या सर्व नवनिर्वाचित सदस्यांची बैठक मुंबईतील ताज लँड हॉटेलमध्ये पार पडली. त्यावेळेस ही निवड करण्यात आली. मंत्री उदय सामंत यांनी शिंदे यांच्या गटनेतापदी नियुक्ती व्हावी, असा ठराव मांडला. हा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला.
शिवसेना राष्ट्रीय कार्यकारिणीच्या निर्देशानुसार शिवसेना मुख्यनेते एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेत ही शिवसेना विधिमंडळ पक्षाची बैठक पार पडली. या बैठकीत ४ ठराव मंजूर करण्यात आले. त्यात पहिला ठराव महाराष्ट्रातील १३ कोटी जनतेचे आभार, दुसरा ठराव पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे अभिनंदन, तिसरा ठराव एकनाथ शिंदे यांच्या अभिनंदनाचा ठराव, चौथा ठराव एकनाथ शिंदे यांची गटनेतेपदी निवड करण्यात येत असल्याचा मंजूर करण्यात आला.
याअगोदर राष्ट्रवादी अजित पवार यांच्या गटाची दुपारी स्वतंत्र बैठक झाली. त्यात गटनेतेपदी अजित पवार यांची करण्यात आली. त्यानंतर रात्री एकनाथ शिंदे यांची निवड करण्यात आली.