शुक्रवार, जून 20, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

राज्यात तीन ठिकाणी शिवसेना परस्परांना भिडल्या

by India Darpan
नोव्हेंबर 20, 2024 | 11:35 pm
in संमिश्र वार्ता
0
Untitled 46

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
मुंबईः एकीकडे सुरळीत मतदान सुरु असतानाच काही ठिकाणी गालबोट लागले. महाराष्ट्रात तीन ठिकाणी शिवसेना शिंदे आणि शिवसेना ठाकरे गटाचे कार्यकर्ते भिडले आहेत. भिवंडी,कोल्हापूर आणि ठाण्यात दोन्ही शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा झाला. मालाडमध्ये संजय निरुपम यांनी आक्रमक पवित्रा घेत खुर्ची आणि टेबल फेकले, तर कोल्हापूरमध्ये सतेज पाटलांनी दोन्ही शिवसेनाचा वाद सोडवला.

मुंबईमध्ये दोन्ही शिवसेनेचे कार्यकर्ते भिडले. त्यात उमेदवारानेही उडी घेतली. मालाड पूर्व पठाण वाडीत शिवसेना आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये कडाक्याचे भांडण झाले. शिवसेनेचे उमेदवार संजय निरुपम यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या मुस्लिम कार्यकर्त्यांवर मारहाणीचा आरोप केला आहे. निरुपम यांनी खुर्ची आणि टेबल फेकल्याचे समोर आले. या वेळी निरुपम यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली. निरुपम म्हणाले, की उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेचे मुस्लिम कार्यकर्ते काही लोकांना जबरदस्तीने ठाकरे शिवसेनेला मत देण्यासाठी घेऊन जात होते. त्यानंतर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. त्या वेळी त्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली.

कोल्हापुरातील कसबा बावडा परिसरात एकनाथ शिंदे गट आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटातील कार्यकर्त्यांमध्ये वाद झाला. उत्तरचे उमेदवार राजेश क्षीरसागर कसबा बावडा परिसरात गेले असता कार्यकर्त्यांमध्ये वाद झाला. शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील कार्यकर्त्यास गद्दार हा शब्द वापरल्याने तणाव निर्माण झाला, त्यानंतर जोरदार राडा झाला. सतेज पाटील यांनी जमलेल्या जमावाला पांगवले. कल्याण पश्चिम विधानसभेत मतदानाच्या दिवशी राजकीय वातावरण तापले. कल्याण पश्चिम विधानसभेतील आधारवाडी परिसरात पोलिंग बूथ लावण्यावरून शिंदे -ठाकरे गटात वाद झाला.

कल्याण पश्चिम पुण्योदय पार्क येथे शिवसेना ठाकरे गटाकडून लावण्यात आलेले बूथची शिंदे गटाकडून तोडफोड करण्यात आली. शिंदे गटाचे माजी नगरसेवक जयवंत भोईर यांनी आरोप फेटाळले. कल्याणमधील खडकपाडा पोलिस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आली असून तपास सुरू केला.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

बिटकॉइन घोटाळ्याप्रकरणी ‘ईडी’ची कारवाई…खा. सु‍ळे, पटोले यांच्यावर आरोप

Next Post

या व्यक्तींनी बोलताना संयम ठेवावा, जाणून घ्या, गुरुवार, २१ नोव्हेंबरचे राशिभविष्य

Next Post
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी बोलताना संयम ठेवावा, जाणून घ्या, गुरुवार, २१ नोव्हेंबरचे राशिभविष्य

ताज्या बातम्या

DAM

गंगापूर धरणाचा साठा ६५.३८ टक्के…तर जिल्ह्यातील इतर धरणाची ही आहे स्थिती…

जून 20, 2025
IMG 20250620 WA0127 1 e1750396792933

जे काही आहे….ते ठाकरे कुटुंबियामुळेच!.. माजी आमदार अनिल कदमांची भावनिक पोस्ट

जून 20, 2025
Picture13FLUO

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर थायलंडहून आलेला २५ कोटीचा हायड्रोपोनिक गांजा जप्त…

जून 20, 2025
crime1

हरवलेल्या मोबाईलचा वापर करीत भामट्यांनी बँक खात्यावर मारला डल्ला

जून 20, 2025
fir111

बहिणीच्या लग्नासाठी कर्ज मिळवून देण्याच्या बहाण्याने मित्रालाच घातला गंडा…गुन्हा दाखल

जून 20, 2025
Untitled 67

रिलायन्स ज्वेल्सतर्फे संपूर्ण भारतात बिग बँगल फेस्ट… या आहे आकर्षक ऑफर्स…

जून 20, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011