रत्नागिरी (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – यांना ओरिजनल शिवसेना नको, उध्दव ठाकरे नको, हा महाराष्ट्र कोणत्या दिशेने तु्म्हाला न्यायचा आहे. असा सवाल उपस्थितीत करत पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी जोरदार हल्ला केला. आम्ही अडीच वर्षे न्याय मागत आहोत, आम्ही हा न्याय सुध्दा उध्दव ठाकरेंसाठी तर देशातील जनतेसाठी मागत आहोत. शिवसेना हे नाव माझ्याकडेच आहे. माझ्या आजोबांनी वडिलांनी ते नाव ठेवले आहे. यासंदर्भात मी कोणाचाही आदेश मानणार नाही असे ठाकरे यांनी स्पष्ट केले,
महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार बाळ माने आणि राजन साळवी यांच्या प्रचारार्थ रत्नागिरी येथील जाहीर सभेला पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी संबोधित केले. यावेळी ते म्हणाले, कोकणातील गुंडागर्दी संपवून कोकणच्या संपूर्ण विकासासाठी महाविकास आघाडी कटीबध्द असल्याचा विश्वास ह्यावेळी उद्धवसाहेबांनी दिला. तसेच ह्या विधानसभा निवडणूकीत राजन साळवी आणि बाळ माने ह्यांना मशाल चिन्हासमोरील बटन दाबून प्रचंड बहुमताने निवडून देण्याचे आवाहन शिवसेनाप्रेमी कोकणी जनतेला केलं.
https://twitter.com/ShivSenaUBT_/status/1853833696740045096