मुंबई – एकीकडे संजय राऊत यांच्यावर ईडीची धाड पडलेली असतांना दुसरीकडे ठाणे येथील शिवसैनिक हे मातोश्रीवर गेले. या ठिकाणी त्यांनी शक्तीप्रदर्शन केले. यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे, खा. अरविंद सावंत हे उपस्थितीत होते. ठाणे येथून खासदार राजन विचारे, आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे यांच्या नेत्वृत्वाखाली हे शिवसैनिक आले होते. यावेळी जोरदार घोषणाबाजी देण्यात आली. या भेटीत जयनाथ पूर्णेकर यांनी त्यांच्या असंख्य सहकाऱ्यांसोबत शिवसेनेमध्ये जाहीर पक्ष प्रवेश केला. शिवसेनेमध्ये मोठी फुट पडल्यानंतर एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाले. त्यामुळे ठाणे येथे शिवसेनेला मोठा धक्का होता. त्यामुळे ठाणे येथे शिवसेना कमकुवत झालेली असतांना आज खा. राजन विचारे यांच्या नेतृत्वाखाली हे शक्तीप्रदर्शन केल्यामुळे तो चर्चेचा विषय ठरला.
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्री बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने तसेच पक्षप्रमुख सन्मा. श्री उद्धवसाहेब ठाकरे आणि आदित्यसाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून श्री. जयनाथ पूर्णेकर यांनी त्यांच्या असंख्य सहकाऱ्यांसोबत शिवसेनेमध्ये जाहीर पक्ष प्रवेश केला. pic.twitter.com/dBdnrP7cQ3
— Rajan Vichare – राजन विचारे (@rajanvichare) July 31, 2022