पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – छत्रपती शिवाजी महाराज हे संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहे. साहजिकच शिवरायांची राजधानी रायगड शिवभक्तांसाठी तीर्थक्षेत्र आहे. यावर्षी रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या 350 व्या राज्याभिषेक दिनानिमित्त शासनाने तसेच शिवभक्तांकडून अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री तसेच अनेक मान्यवर, शासकीय अतिमहत्वाच्या व्यक्ती आणि लाखो शिवभक्तांनी महाराजांना अभिवादन करण्यासाठी रायगडावर हजेरी लावली.
रायगड हा तसा दुर्गम आणि भौगोलिक दृष्ट्या अतिशय अवघड आहे. भारताचे नं.1 नेटवर्क जिओ च्या वतीने या राज्यभिषेक दिना निमित्त स्वतः पुढाकार घेऊन आपले नेटवर्क स्थापित केले. यामुळे लाखो शिवभक्तांनी जिओचे आभार मानले. याआधी किल्ल्यावर कोणतेच नेटवर्क उपलब्ध नव्हते परंतु जिओच्या वतीने प्रथमच किल्ल्यावर 3 ठिकाणी अत्याधुनिक यंत्रणा आणी उपकरणे कार्यान्वित करून गडावर तसेच गडाच्या आत अतिशय कमी वेळात नेटवर्क उपलब्ध करून दिले. यामुळे असंख्य शिवभक्तांना घरी तसेच आपल्या प्रियजनांना कॉल तसेच व्हिडीओ कॉल करता आला.
अनेक वयोवृद्ध शिवभक्तांना यामुळें घरबसल्या रायगडावरील अनोखा सोहळा पाहता आला. विशेष म्हणजे याआधी किल्ल्यावर नेटवर्क ची अतिशय मर्यादित उपलब्धता असल्याने कॉल करण्यास समस्या येत होती. जिओ ने स्वतः पुढाकार घेऊन नेटवर्क ची आपुर्ती केल्याने लाखो शिवप्रेमी, जिल्हा तसेच तालुका प्रशासन आणि पोलीस यंत्रणेकडून जिओ चे आभार मानले. अतिशय कमी कालावधीत आव्हानात्मक ठिकाणी नेटवर्क उपलब्ध करणाऱ्या जिओ अभियंत्यांचे सर्व थरातून कौतुक होत आहे
Shivrajyabhishek Raigarh Reliance Jio