नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- १३ ऑक्टोबर रोजी मुंबई नाका या नाशिकच्या मध्यवर्ती ठिकाणी ब्रह्माकुमारी संस्थेची शिवदर्शन भवन नामक नवीन वास्तूचे उद्घाटन ब्रह्माकुमारी संतोष दीदीजी यांच्या शुभहस्ते करण्यात येणार आहे. कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी अध्यात्मिक धार्मिक राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांना आमंत्रित करण्यात आलेले आहे. उद्घाटनाच्या या कार्यक्रमात शिव ध्वजारोहणांसोबत संतोष दादीजी यांचे बँड पथकासह मोठ्या धुमधडाक्यात स्वागत होणार आहे.
पूर्वी ब्रह्माकुमारी संस्थेचे हे सेवा केंद्र राणेनगर सिडको येथे कार्यान्वित होते या ठिकाणी ब्रह्माकुमारी विना दीदी या संस्थेच्या जिल्हा मुख्य प्रशासिका वासंती दीदीजी यांच्या मार्गदर्शनाखाली ईश्वरीय सेवा देत असत. ईश्वरीय सेवेचा विस्तार बघता हे ठिकाण साधकांसाठी अपुरे पडू लागले. त्यामुळेच सगळ्यांच्या एक विचाराने मुंबई नाका येथील महाराष्ट्र ग्रामीण बँकेशेजारी,इनायत कॅफेच्या बाजूला,कृष्णा हॉटेलच्या मागे, इंदिरानगर बोगद्याजवळ सुचिता नगर. नाशिक या ठिकाणी एक भूखंड घेऊन त्यावर शिवदर्शन भवन या वास्तूचे निर्माण करण्यात आले. या वास्तूचा भूमिपूजन सोहळा २०२१ मध्ये संस्थेच्या सहमुख्य प्रशासिका ब्रह्मकुमारी संतोष दादीजी यांच्या हस्ते व वृक्षारोपण आंतरराष्ट्रीय वक्त्या ब्रह्माकुमारी शिवानी दीदी यांच्या हस्ते संपन्न झाला होता. अल्पावधीतच सगळ्यांच्या सहकार्याने या वास्तूचे निर्माण करण्यात आले.
तीन मजली असलेली ही वास्तू परिसरातील साधक व नागरिकांच्या आध्यात्मिक उन्नतीचे एक केंद्र म्हणुन प्रस्थापित झालेले आहे. या केंद्रातून विविध कॉन्फरन्स संमेलन अध्यात्मिक कोर्स तणाव मुक्त जीवन मूल्य कोर्स, व्यक्तिमत्व विकास, बाल संस्कार शिबिर, डॉक्टर वकील इंजिनियर्स इत्यादींसाठी कार्यशाळा इत्यादी कार्यक्रमान मधून जनसेवा साधली जाणार आहे, अशी माहिती येथील संचालिका ब्रह्माकुमारी वीणा दीदी यांनी दिली. येथील सभागृह ची आसन व्यवस्था ४०० ते ५०० साधकांची असून सभागृहात लावण्यात आलेले सुविचार मनाला नवी ऊर्जा प्रदान करतात. नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून येथील सभागृह हायटेक बनवण्यात आले आहे.
सीसीटीव्ही सर्विलांसद्वारे सुरक्षेची काळजी घेण्यात आली आहे. परिसरातील नागरिक व साधकांना मेडिटेशन करता यावे यासाठी या ठिकाणी ध्यान कक्ष बनविण्यात आला आहे. या ध्यान कक्षातून तणामुक्तीची सहजच अनुभूती होते. राणेनगर राजीव नगर पाथर्डी फाटा घोटी इगतपुरी गोविंद नगर इंदिरानगर भाभा नगर, तिडके कॉलनी अशा परिसरातील नागरिकांसाठी अतिशय सोयीचे बनलेले हे केंद्र नक्कीच सगळ्यांच्या आत्म उन्नतीचे केंद्र ठरेल असा आशावाद दीदींनी प्रगट केला आहे.