अक्षय कोठावदे,नाशिकॉ
नाशिकची सुकन्या असलेल्या अवघ्या दहा वर्षांच्या शिवांजली पोरजे हिने सध्या सोशल मीडियावर धम्माल केली आहे. अवघ्या एका वर्षातच शिवांजलीचे सोशल मीडियावर ३० लाख फॉलोअर्स झाले आहेत. इंस्टाग्राम, फेसबुक व्हाट्सअप सारख्या सोशल मीडियात शिवांजली अत्यंत कमी कालावधीत लोकप्रिय झाली आहे.
शिवांजली ने २०२० पूर्वी आपल्या अभिनयाचा एक व्हिडिओ पोस्ट केला होता. त्याला चाहत्यांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला होता. शिवांजलीचा जन्म नाशिक येथे झाला असून ती सध्या इयत्ता चौथीत शिकत आहे. शिवांजली ही इंस्टाग्राम वर इन्स्टाक्वीन म्हणून चांगली चर्चेत आली आहे. एवढ्या कमी वयात शिवांजलीने घेतलेली गगनभरारी नाशिकसाठीच नव्हे तर, सर्वांसाठी अभिमानास्पद बाब आहे.
जागतिक बाल दिनानिमित्त शिवांजलीला इंडिया दर्पण न्यूज परिवारातर्फे यशस्वी वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा.









