नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे एक अद्वितीय व्यक्तिमत्त्व. सगळीकडे शिवजयंती उत्साहात साजरी केली जाते. पण शिवाजी महाराज म्हंटल की डोळ्यासमोर येते ती शिवाजी महाराज आणि त्यांच्या मावळ्यांच्या पराक्रमाची यशोगाथा, लढाया, गड किल्ले, शिवनेरीवरील त्यांचे बालपण. यापलीकडे जाऊन शिवाजी महाराज आणि नाशिकच एक वेगळ नातं आहे. हे नातं लढाई पुरत मर्यादित नसून छत्रपतींच्या बालपणाशी संबंधित आहे. जुन्या नाशकातील काझीगढी वरील पाटील वाड्यात बालशिवाजी वडील शहाजीराजे आणि आई राजमाता जिजाऊ यांच्यासह काही काळ वास्तव्यास होते.
हा पाटील वाडा नक्की कोणता आहे आणि त्यांच्या सतराव्या पिढीतील सुनील कोठावळेंशी इंडिया दर्पणच्या प्रतिनिधींनी साधलेला हा संवाद….
बघा संपूर्ण व्हिडिओ