इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
सत्ताधारी पक्षातील कलंकित, भ्रष्टाचारी व असंवेदनशील मंत्री व आमदार यांना तात्काळ बडतर्फ करण्याबाबत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना – उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या शिष्टमंडळांने राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांना आज पत्र दिले.
या भेटीत राज्य मंत्रिमंडळातील अनेक मंत्र्यांच्या गैरव्यवहार आणि प्रकरणाबद्दल माहिती पत्राद्वारे दिली. मंत्री संजय शिरसाठ, कृषी मंत्री माणिकराव कोकाटे ,राज्य मंत्री योगेश कदम तसेच मंत्री नितेश राणे यांच्या गंभीर प्रकरणाची वस्तुस्थिती स्थिती राज्यपाल यांच्यासमोर मांडली.
राज्यातील हनी ट्रॅप प्रकरण, ठाणे बोरिवली बोगदा प्रकरण, मीरा भाईंदर महापालिकेच्या भूसंपादन प्रक्रियेत गैरव्यवहार अशा अनेक प्रकरण संदर्भात राज्यपाल यांना पत्राद्वारे माहिती दिली..
याप्रसंगी शिवसेना नेते अनिल परब, उपनेते विनोद घोसाळकर, बबनराव थोरात, अशोक धात्रक, विजय कदम, नितीन नांदगावकर, विठ्ठलराव गायकवाड, भाऊ कोरगावकर, सुष्माताई अंधारे, सुप्रदाताई फातप्रेकर, विशाखाताई राऊत, सचिव साईनाथ दुर्गे, पराग डाके, आमदार मिलिंद नार्वेकर, नितीन देशमुख, अनंत नर व महेश सावंत उपस्थित होते.