नाशिक : शहरातील वाढती कोरोना बाधितांची संख्या चिंताजनक आहे. वाढत्या रुग्णसंख्येला अाळा घालण्यासाठी जिल्ह्यात दहा दिवस कडकडीत निर्बंध लागू करण्यात आली आहे. रुग्णसंख्येच्या विस्फोटाला अळा घालण्यासाठी प्रशासनासह लोकप्रतिनिधी देखील सर्वोतपरी प्रयत्न करीत असून शिवसेनेने अवघ्या शहरात हायक्लो क्लोराईड सॅनिटायझर फवारणी करण्याचा निर्णय घेतला आहे. खासदार हेमंत गोडसे यांच्या संकल्पनेतून आज शहरातील महापालिकेच्या सहा विभागात सॅनिटायझरची जोरदार फवारणी करण्यात आली. या उपक्रमाचा प्रारंभ शालीमार चौकातील शिवसेना मध्यवर्ती कार्यालयापासून करण्यात आला. साठ टॅक्ट्ररांच्या सहाय्याने दिवसभर शहरातील चौकाचौकात हायक्लो क्लोराईड सॅनिटायझर फवारणी करण्यात आल्याने नागरिकांनी खा. गोडसे यांच्या या उपक्रमाविषयी शहरवासियांकडून समाधान व्यक्त होत आहे.
गेल्या काही दिवसांपासून शहरात पुन्हा कोरोना महामारी डोके वर काढल्याची खा. गोडसे यांनी गंभीर दखल घेवून सेनेच्या जिल्हास्तरीय पदाधिकाऱ्यांशी चर्चा करीत संपूर्ण शहरात सॅनिटायझर फवारणीचा निर्णय घेतला. आज सकाळी शालीमार येथील शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालय येथून खा. गोडसे यांच्या हस्ते सॅनिटायझर फवारणीच्या उप्रकमास प्रारंभ करण्यात आला. यावेळी शिवसेनेचे उपनेते तथा माजी मंत्री बबनराव घोलप, महानगरप्रमुख सुधारक बडगुजर, माजी जिल्हाप्रमुख दत्ता गायकवाड, विनायक पांडे, माजी आमदार वसंत गिते, योगेश घोलप आदींसह शिवसेनेचे मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते.
शहरातील वाढती रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी खा. गोडसे यांनी यापूर्वी विशेष प्रयत्न करुन सात हजार रेमेडिसिवीर इंजेक्शन जिल्हावासियांसाठी आणण्यात आले होते. तसेच ऑक्सिजनच्या तुटवड्याचे गांभीर्य लक्षात आणून देत खा. गोडसे यांनी शासनाकडून ऑक्सिजनचा दररोज होणारा ८५ मे. टन पुरवठा १०० मे. टन इतका कोटा मंजूर करुन घेतला. रेमेडिसिवीर आणि ऑक्सिजनच्या उपलब्धतीनंतर खा. गोडसे यांनी आता सॅनिटायझर फवारणी हा उप्रकम हाती घेतला आहे. या फवारणी उपक्रमामुळे शहर निर्जंतुकीकरण होण्यात मोठी मदत होणार असून या उपक्रमाचा निश्चितच फायदा होणार असल्याचा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला. आज दिवसभर ६० ट्रॅक्टरच्या माध्यमातून महानगरपालिकेच्या सिडको, सातपूर, नाशिकरोड, पंचवटी, पूर्व, पश्चिम या सहाही विभागात हायक्लो क्लोराईड सॅनिटायझर फवारणी करण्यात आली. फवारणी उपक्रमात शिवसैनिकांनी उर्त्स्फूतपणे सहभाग नोंदविला. खा. गोडसे यांनी राबविलेल्या या उपक्रमाचे शहरवासियांकडून विशेष कौतूक होत आहे.
…..
शहर कोरोनामुक्तीसाठी शेतकरी सरसावले
नाशिक शहर कोरोनामुक्त होण्यासाठी प्रशासनासह सर्वच यंत्रणा कार्यरत असून शहराच्या कोरोनामुक्तीसाठी नाशिक शहरालगतच्या ग्रामीण भागातील शेतकरी देखील पुढे सरसावले आहे. शिवसेनेतर्फे करण्यात येणाऱ्या या फवारणीसाठी तालुक्यातील गिरणारे, सैय्यदपिंप्री, लहवित, भगूर, देवळाली कॅम्प, बेलतगव्हाण आदी ग्रामीण भागातील शेतकऱ्यांनी खा. गोडसे यांनी शब्द टाकताच सकारात्मक प्रतिसाद देत आपली ट्रॅक्टर फवारणी यंत्रासह उपलब्ध करुन दिली.