नाशिक – शिवसेनेत मोठी फुट पडल्यानंतर आता नव्याने पदाधिका-यांच्या नियुक्त्या करण्यात येत आहे. जिल्हयातील दोन्ही शिवसेनेचे आमदार शिंदे गटात सामील झाल्यामुळे ग्रामीण भागातील पदाधिकारी बदलण्यात आले आहे. दिंडोरी लोकसभा व मालेगाव भागात तूर्तास बदल करण्यात आले आहे. या नियुक्तीची बातमी शिवसेनेचे मुखपत्र दै. सामनामध्ये प्रसिध्द करण्यात आली आहे. त्यात म्हटले आहे. नाशिक जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकारी जाहीर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने नाशिक जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त खालील प्रमाणे जाहीर करण्यात आलेले आहेत अशी माहिती शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्ध देण्यात आलेल्या पत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे. जयंत दिंडे संपर्कप्रमुख दिंडोरी लोकसभा, अल्ताफ खान सहसंपर्कप्रमुख दिंडोरी लोकसभा, सुनील पाटील जिल्हाप्रमुख विधानसभा दिंडोरी, कळवण, बागलाण, गणेश धात्रक जिल्हाप्रमुख विधानसभा नांदगाव, मालेगाव बाह्य, मालेगाव मध्य, कुणाल दराडे, जिल्हाप्रमुख विधानसभा निफाड, येवला, चांदवड.