अजय सोनवणे, इंडिया दर्पण वृत्तसेवा
मनमाडमध्ये शिवसेनेच्या आजी माजी पदाधिकारी व लोकप्रतिनिधींनी बैठक घेऊन शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या पाठीशी गंभीरपणे उभे राहण्याचा निर्णय घेतला. यावेळी शिवसैनिकांनी छत्रपती शिवाजी महाराज व डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ एकत्र येत जोरदार घोषणाबाजी केली. उध्दव ठाकरे आगे बढो हम तुम्हारे साथ है….शिवसेना अंगार बाकी सब भंगार है….कोण आला कोण आला शिवसेनेचा वाघ आला अशा घोषणा देत परिसर दणाणून सोडला. यावेळी पक्ष सोडून गेलेल्या बंडखोर आमदारांचा यावेळी निषेध करण्यात आला. आम्ही निष्ठावान शिवसैनिक आहोत.आमच्या निष्ठा शिवसेनेशी आहे. अशी भूमिका शिवसैनिकांनी व्यक्त केली. २९ जून रोजी निष्ठावान शिवसैनिकांतर्फे रॅली काढून शक्तीप्रदर्शन करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.