अजय सोनवणे, इंडिया दर्पण वृत्तसेवा
शिवसेनेतून आमदार बंडखोरी करत बाहेर पडल्याने राज्यातील राजकारण वेगळ्या टोकाला पोहचले आहे. शिवसेना पक्ष प्रमुख बंडखोर आमदारांना बोलवत असताना त्यास प्रतिसाद मिळत नसल्याने राज्यातील कट्टर शिवसैनिकांनी बंडखोरांविरोधात रस्त्यावर उतरत आंदोलन सुरू केले आहे. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या पाठीशी असल्याचे स्पष्ट केले. आज सटाणा शहरात बस स्थानका जवळ पुन्हा एकदा शिवसैनिकांनी आंदोलन करत बंडखोर आमदारांचा पुतळा जाळत निषेध व्यक्त केला.