मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- शीतल देवी या भारताच्या महिला दिव्यांग तिरंदाज खेळाडूने दक्षिण कोरियात झालेल्या ग्वांगजू येथे झालेल्या जागतिक दिव्यांग तिरंदाजी अजिंक्यपद स्पर्धा २०२५ मध्ये महिलांच्या वैयक्तिक कंपाउंड प्रकाराचं सुवर्णपदक पटकावलं. याबरोबरच ती भारताची पहिली वैयक्तिक पॅरा तिरंदाज विश्वविजेती ठरली. तिच्या या ऐतिहासिक कामगिरीबद्दल राष्ट्रीय औष्णिक विद्युत महामंडळ लिमिटेडने तिचे अभिनंदन केले आहे. शीतल देवीची ही दुर्मिळ आणि उल्लेखनीय कामगिरी राष्ट्रासाठी अभिमानास्पद क्षण असून, जगभरातील हजारो लोकांसाठी अडचणींवर मात करून यशस्वी होण्यासाठी प्रेरणा म्हणून काम करेल असे महामंडळाने म्हटलं आहे. या ऐतिहासिक विजयातून महत्त्वपूर्ण शीतल देवी हिची, असामान्य प्रतिभा, चिकाटी आणि दृढनिश्चयाची प्रचिती येते, आणि ती लाखो लोकांसाठी प्रेरणादायी आहे असेही महामंडळाने म्हटले आहे.
राष्ट्रीय औष्णिक विद्युत महामंडळ लिमिटेड गेल्या अनेक वर्षांपासून भारतीय तिरंदाजी संघटनेशी जोडलेले असून, संघटेसोबतच्या आपल्या या नात्याचा आणि देशभरात तिरंदाजी या खेळाच्या विकासासाठी, या खेळाला प्रोत्साहन देण्याच्या आपल्या सातत्यपूर्ण वचनबद्धतेचा प्रचंड अभिमान वाटत असल्याचे महामंडळाच्या निवेदनात म्हटले आहे. देशात या खेळाची प्रगती आणि विस्तार व्हावा यासाठी राष्ट्रीय औष्णिक विद्युत महामंडळ २०१८ पासून यासाठीच्या प्रयत्नांना पाठबळ देत आहे. युवकांचे सक्षमीकरण, क्रीडा क्षेत्रातील उत्कृष्टतेला प्रोत्साहन आणि जागतिक क्रीडा पटलावर भारताच्या अस्तित्वाला बळकटी देत, देशाच्या जडणघडणीच्या संकल्पाला बळकटी देणे हा यामागचा उद्देश आहे.
आपल्या याच वचनबद्धतेचा एक भाग म्हणून, राष्ट्रीय औष्णिक विद्युत महामंडळाने अलिकडेच देशभरात तिरंदाजीला प्रोत्साहन देण्यासाठी आणि या खेळाच्या प्रगतीसाठी पुढच्या चार वर्षांकरता २४२० लाख रुपये इतके आर्थिक पाठबळ उपलब्ध करून देण्यासाठी भारतीय तिरंदाजी संघटनेसोबतच्या कराराचे नूतनीकरणही केले. या भागीदारीच्या माध्यमातून राष्ट्रीय औष्णिक विद्युत महामंडळाचा राष्ट्रीय मानांकित तिरंदाजी स्पर्धा, राष्ट्रीय तिरंदाजी अजिंक्यपद स्पर्धा, राष्ट्रीय दिव्यांग तिरंदाजी अजिंक्यपद स्पर्धांच्या आयोजनासाठी पाठिंबा राहणार आहे. यासोबतच ते आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सहभागी होणाऱ्या भारतीय तिरंदाजी संघांसाठी क्रिडा साहित्याचे संच आणि गणवेशाची तरतूदही करणार आहे. राष्ट्रीय औष्णिक विद्युत महामंडळ या सहकार्यातून, महामंडळ भारताच्या क्रीडा परिसंस्थेच्या प्रगतीसाठी आणि साततत्यपूर्ण पाठबळाच्या माध्यमातून तसेच, पायाभूत सुविधांच्या विकासाद्वारे भारताच्या खेळाडूंची जागतिक स्तरावर ओळख निर्माण व्हावी याकरता समर्पण भानवेने करत असलेल्या प्रयत्नही ठळकपणे अधोरेखित होतात.