धुळे – शिरपूर येथे मुकेशभाई पटेल जम्बो कोविड सेंटर मध्ये हवेतून ऑक्सिजन तयार करणारी यंत्रणा युध्दपातळीवर उभारण्यात येत आहे. हवेतून ऑक्सिजन निर्मिती करणाऱ्या या प्रकल्पाची क्षमता दररोज सुमारे ३० ते ३२ मोठे सिलेंडर ऑक्सिजन निर्मिती करण्याची आहे. माजी मंत्री अमरिश पटेल, शिरपूरच्या नगराध्यक्ष जयश्री पटेल आणि उपनगराध्यक्ष भूपेश पटेल यांनी या कामासाठी ४० लाख रुपये देणगी दिली असून येत्या आठवड्यात हे काम पूर्ण होईल. परिणामी, उत्तर महाराष्ट्रासह राज्याच्या अनेक भागात या ऑक्सिजनचा पुरवठा होऊ शकणार आहे.