रविवार, जून 22, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

शिर्डी विमानतळावरुन रात्रीच्या विमानसेवांना सुरुवात…

by India Darpan
मार्च 31, 2025 | 5:23 pm
in महत्त्वाच्या बातम्या
0
शिर्डी विमानतळ 1 1024x682 1

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- शिर्डी आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर रात्रीच्या विमानसेवांना अधिकृतपणे सुरुवात करण्यात आली आहे. धावपट्टीच्या डांबरीकरणाचे काम यशस्वीरित्या पूर्ण झाल्याने ही ऐतिहासिक सुविधा सुरू करण्याचा मार्ग मोकळा झाला. महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी (एमएडीसी) आणि संबंधित नियामक संस्थांच्या प्रयत्नांमुळे शिर्डीतील हवाई वाहतूक सेवा नव्या उंचीवर पोहोचली आहे.

या नव्या टप्प्याचा लाभ यात्रेकरूंना तसेच पर्यटकांना होणार असून, इंडिगो एअरलाइन्सने सेवेत दोन नवीन विमानांची भर घातली आहे. विशेषतः, हैदराबाद-शिर्डी-हैदराबाद मार्गावर ७८ प्रवाशांच्या क्षमतेचे नियमित विमान सुरू करण्यात आले आहे. ही सेवा गुढीपाडवा आणि उगादीच्या शुभप्रसंगी यात्रेकरूंना भेट म्हणून सुरू करण्यात आली आहे.

या विस्तारामुळे शिर्डी विमानतळ दररोज एकूण ११ विमानांची (२२ हालचाली) हाताळणी करेल, ज्याद्वारे दररोज सुमारे २२०० प्रवाशांना सेवा देण्यात येईल. हे पायाभूत सुविधा आणि हवाई वाहतूक क्षेत्रासाठी मोठे यश मानले जात आहे. श्री साईबाबांचे दर्शन घेण्यासाठी आणि पहाटे ४ वाजता होणाऱ्या काकड आरतीला उपस्थित राहण्यासाठी येणाऱ्या भाविकांसाठी ही सेवा उपयुक्त ठरणार आहे. अनेक विमान कंपन्यांनीही शिर्डीसाठी अधिक सेवा सुरू करण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

शिर्डी विमानतळावर रात्रीच्या कालावधीत विमानसेवा सुरू होणे हे मुख्यमंत्री आणि महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीचे अध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीमुळे शक्य झाले आहे. या ऐतिहासिक क्षणाबद्दल बोलताना, महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती पांडे यांनी सांगितले की, ही सुविधा केवळ हवाई वाहतूक क्षेत्रासाठीच नाही, तर धार्मिक पर्यटनालाही चालना देण्यासही मदत करणारी ठरेल. शिर्डीच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे भविष्यात येथे आणखी सेवा उपलब्ध करून दिल्या जातील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

संतोष देशमुख हत्या प्रकरणात चौकशी झालेल्या त्या महिलेची हत्या? पाच वेगवेगळ्या नावाचा करायची वापर…अंजली दमानियांचा गंभीर आरोप

Next Post

वाल्मिक कराडच्या सांगण्यावरुन आम्हालाच मारहाण…महादेव गितेचा आरोप

Next Post
KARAD

वाल्मिक कराडच्या सांगण्यावरुन आम्हालाच मारहाण…महादेव गितेचा आरोप

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी बेकायदेशीर व्यवहार टाळावे, जाणून घ्या, रविवार, २२ जूनचे राशिभविष्य

जून 21, 2025
aditya thackeray e1703150861580

कुठल्याही भाषेला विरोध नाही…आदित्य ठाकरे यांची सोशल मीडियावर केली ही पोस्ट

जून 21, 2025
crime1

वाहनचोरीचे सत्र सुरूच…वेगवेगळया भागातून तीन मोटारसायकली चोरीला…

जून 21, 2025
Oplus_0

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची प्रकट मुलाखत सरस प्रश्नांने रंगली…

जून 21, 2025
Untitled 70

नाट्य आणि चित्रपट अभिनेता तुषार घाडीगावकर याची आत्महत्या…

जून 21, 2025
crime 13

धक्कादायक…बाल्कनीत साठलेल्या पाण्याच्या वादातून लोटून दिल्याने एकाचा मृत्यू

जून 21, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011