शिर्डी (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – श्री साईबाबांचे समाधीस्थळ असलेले शिर्डी आणि तिरुपती बालाजीचे देवस्थान असलेले तिरुपती ही दोन्ही स्थळे आता विमानसेवेद्वारे जोडली गेली आहेत. स्पाईसजेट या आघाडी विमानसेवा कंपनीने ही सेवा सुरू केली आहे. सद्यस्थितीत ही सेवा आठवड्यातील तीन दिवस आहे. म्हणजेच, मंगळवार, गुरुवार आणि शनिवार असे तीन दिवस ही सेवा असणार आहे. त्यानंतर वाढता प्रतिसाद पाहता या सेवेचा विस्तार केला जाणार आहे. दुपारी २ वाजता विमान तिरुपतीहून निघेल आणि ते पावणेचार वाजता शिर्डीला पोहचेल. त्यानंतर हेच विमान दुपारी ४ वाजता निघेल आणि सायंकाळी साडेपाच वाजता तिरुपतीला पोहचेल. नगर, नाशिक, औरंगाबादसह परिसरातील विमान प्रवाशांना या सेवेचा मोठा फायदा होणार आहे.
https://twitter.com/Deepakk75058621/status/1508766853979840520?s=20&t=5__yN9vTbPX2bvRQUhw36A