सोमवार, नोव्हेंबर 24, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

शिर्डीतील साईबाबा रुग्णालयात तब्बल १८ हजाराहून रुग्णांवर मोफत उपचार; लाभ घेण्यासाठी फक्त हे करा

मार्च 17, 2023 | 5:24 am
in राज्य
0
Shirdi Hospital

 

शिर्डी (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – येथील श्री.साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था या संस्थानच्या श्री.साईबाबा हॉस्पिटलमधील रूग्णांसाठी महाराष्ट्र शासनाची महात्मा ज्योतीबा फुले जन आरोग्य योजना ‘जीवनदायी’ ठरली आहे. या योजनेत २०१७ ते २०२२ या मागील पाच वर्षात १८ हजार ८२३ रूग्णांवर उपचार करण्यात आले. या उपचारांच्या खर्चापोटी शासनाकडून रूग्णालयास १०९ कोटी ४८ लाख ४२ हजार रूपयांच्या विमा रक्कमेची प्रतिपूर्ती करण्यात आली आहे. अशी माहिती रूग्णालयाचे प्रभारी उपवैद्यकीय संचालक डॉ.प्रितम वडगावे यांनी दिली आहे.

तळागाळातील श्रमजीवी असो वा, मध्यमवर्गीय कुटुंबीय असो, आरोग्यविषयक प्रश्न उद्भवल्यास खर्चाचा प्रश्न उभा राहतो. अनेक आजारांवरील औषधोपचाराचा खर्च प्रचंड आहे. दिवसागणिक होणाऱ्या खर्चाचे आकडे हजार ते लाखाच्या घरात पोहोचतात. अनेक कुटुंबांच्या आवाक्याबाहेरील तो खर्च आहे. ही बाब लक्षात घेऊन नोव्हेंबर २०१३ पासून राज्यशासनाने ‘राजीव गांधी योजना’सुरू केली. २०२० या योजनेचे ‘महात्मा फुले जीवनदायी आरोग्य योजना’ असे नामांतर करत ती नव्याने कार्यान्वित करण्यात आली.

विमा कंपनीकडून उपचाराचे पूर्ण देयक मिळत असल्याने रुग्णालयांना नातेवाईकांकडून एकही रुपया घेता येत नाही. त्यामुळे ही योजना श्री.साईबाबा रूग्णालयात येणाऱ्या आर्थिक दुर्बल रुग्णांसाठी वरदान व जीवनदायी ठरत आहे. या योजनेंतर्गत दारिद्र्यरेषेखालील तसेच दारिद्र्यरेषेवरील एक लाखापर्यंत वार्षिक उत्पन्न असणाऱ्या कुटुंबीयांतील लोकांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. प्रतिवर्षी विम्याचा हप्ता शासन मार्फत अदा केला जातो. तसेच प्रतिवर्षी दीड लाख रुपयांची हमी दिली जात आहे. या योजने अंतर्गत बाराशे आजारांवर उपचार केले जातात. १२७ सेवांची फेरतपासणी उपचारांचा लाभ घेता येतो व ३१ विशेष सेवांचा समावेश करण्यात येतो आणि रूग्णांना सर्व सेवा नि:शुल्क दिल्या जातात. विमा रक्कमेच्या मर्यादेत कुटूंबातील सर्व व्यक्तींना याचा लाभ घेता येतो.

या योजनेत श्री.साईबाबा रूग्णालयांत २०१७-१८ या वर्षात ४५६७ रूग्णांवर उपचारापोटी २९ कोटी २० लाख ४४ हजार ८०३ रूपये, २०१८-१९ या वर्षात ३९३८ रूग्णांवर उपचारापोटी २८ कोटी ८२ लाख ७८ हजार २६६ रूपये, २०१९-२० या वर्षात ४५१४ रूग्णांवर उपचारापोटी २२ कोटी ५७ लाख ७१ हजार ४१५ रूपये, २०२०-२१ या वर्षात २३२९ रूग्णांवर उपचारापोटी १३ कोटी ९९ लाख ८२ हजार ७९८ रूपये व २०२१-२२ या वर्षात ३४७५ रूग्णांवर उपचारापोटी १४ कोटी ८७ लाख ६४ हजार ७५७ रूपयांच्या विमा रक्कमेची प्रतिपूर्ती करण्यात आली.

‘‘महात्मा फुले योजनेत माझी ह्दयाची शस्त्रक्रिया करण्यात आली. खासगी रूग्णालयातील खर्च परवडणारा नव्हता म्हणून साईबाबा रूग्णालयात उपचार घेतले. येथील आरोग्य सुविधा सुसज्ज आहेत. यामुळे मला नवीन जीवन ‍मिळाले.’’ अशी प्रतिक्रिया नाशिक मधील येवला तालुक्यातील अंदरसूल येथील रतन रानोबा गायकवाड यांनी दिली आहे.

‘‘महात्मा फुले योजनेत माझी व्हॉल्व्ह रिप्लेसमेंट (valve replacement) शस्त्रक्रिया करण्यात आली. यामुळे आज मी अधिक सुदृढ आयुष्य जगत आहे. गोर-गरीब रूग्णांसाठी महात्मा फुले जन आरोग्य योजना वरदान आहे. अशी प्रतिक्रिया यवतमाळ जिल्ह्यातील पुसद तालुक्यातील शेलोना येथील शांताबाई प्रकाश कोल्हे यांनी दिली आहे.

महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे –
• रेशन कार्ड (पिवळे, केशरी, अन्तोदय, अन्नपूर्णा)
• पांढरी रेशनकार्ड व ७/१२ उतारा (शेतकरी आत्महत्याग्रस्त १४ जिल्ह्यांसाठी)
• ओळखपत्र – (आधार कार्ड, मतदान कार्ड, राष्ट्रीयकृत बँक पासबुक व इतर शासनमान्य ओळखपत्र)
• लहान मुलासाठी (६ वर्ष वयापेक्षा कमी) जन्माचा दाखला, आई किंवा वडिलांचे ओळखपत्र.
• फाटलेले रेशन कार्ड किंवा रेशन कार्ड मध्ये त्रुटी असतील तर तहसिलदाराचे प्रमाणपत्र किंवा दुय्यम शिधापत्रिका

Shirdi Saibaba Hospital Free of Cost Treatment

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

लासलगाव बाह्य वळण रस्त्याचे काम कधी पूर्ण करणार? बांधकाम मंत्र्यांनी दिला हा शब्द

Next Post

धरणगावचा नायब तहसिलदार आणि कोतवाल एसीबीच्या जाळ्यात; यासाठी मागितली ३० हजाराची लाच

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा शुक्रवारचा दिवस… जाणून घ्या, १४ नोव्हेंबरचे राशिभविष्य…

नोव्हेंबर 13, 2025
Vishwadharmi Manavta Teertha Rameshwar Rui
महत्त्वाच्या बातम्या

उध्वस्त मंदिर व मशिदीच्या जागी ‘विश्वधर्मी मानवतातीर्थ भवन’… उद्या होणार लोकार्पण… अशी आहेत त्याची वैशिष्ट्ये…

नोव्हेंबर 13, 2025
traffic signal1
महत्त्वाच्या बातम्या

अहिल्यानगर – मनमाड मार्गावरील वाहतुकीबाबत झाला हा महत्वाचा निर्णय…

नोव्हेंबर 13, 2025
IMG 20251113 WA0024
मुख्य बातमी

कुंभमेळ्यासाठी साडेपाच हजार कोटी रुपये खर्चाच्या विकासकामांचे भूमीपूजन…

नोव्हेंबर 13, 2025
IMG 20251113 WA0023
महत्त्वाच्या बातम्या

पंचवटीतील रामकाल पथचे मुख्यमंत्र्यांनी केले भूमीपूजन… रामकुंडाचा चेहरामोहरा बदलणार…

नोव्हेंबर 13, 2025
IMG 20251113 WA0021
महत्त्वाच्या बातम्या

नाशिक जिल्हा परिषदेच्या नूतन इमारतीचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण… अशी आहेत तिची वैशिष्ट्ये…

नोव्हेंबर 13, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा गुरुवारचा दिवस… जाणून घ्या, १३ नोव्हेंबरचे राशिभविष्य…

नोव्हेंबर 12, 2025
thandi
महत्त्वाच्या बातम्या

या शहरात तीव्र थंडीची लाट… असा आहे हवामानाचा अंदाज…

नोव्हेंबर 12, 2025
Next Post
Corruption Bribe Lach ACB

धरणगावचा नायब तहसिलदार आणि कोतवाल एसीबीच्या जाळ्यात; यासाठी मागितली ३० हजाराची लाच

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011