शिर्डी (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शिर्डीच्या साईबाबावंर भाविकांची अपार श्रद्धा आहे. साईबाबा सर्व धर्म समभावाचे श्रद्धस्थान असल्याने सर्व जाती धर्माचे भाविक या ठिकाणी नतमस्तक होतात. शिर्डीच्या साईबाबांनी आपले संपूर्ण जीवन फकीर अवस्थेत व्यतीत केले. भिक्षा मागून आपला उदरनिर्वाह केला. पण त्याच्या भक्तांनी त्यांना कुबेर स्वरुप बनवले आहे. साईबाबा मंदिरात दररोज हजारो भाविक येतात. सलग सुट्टीच्या दिवसात दोन ते तीन लाख भक्त साईबाबा समाधीचे दर्शन घेतात. मागे कोरोना संकट काळात दोन वर्ष मंदिर भाविकांसाठी बंद राहीले होते. मात्र त्यानंतर मंदिर खुले झाल्यापासून भाविकांचा शिर्डीला येण्याचा ओघ पूर्वरत होताना दिसत आहे. येथे येऊन भाविक फुले हार अर्पण करतात .तसेच श्रीफळ आणि प्रसाद वाहतक परंतु यापुढे भाविकांना असे करता येणार नाही.
साईं बाबा नवसाला पावतात, मनातील सर्व इच्छा पूर्ण करतात, बाबांना एका हाताने दान केले तर बाबा दहा हाताने भरभरुन देतात”, अशी भाविकांची धारणा आहे. त्यामुळे येथे येणारा भाविक साईंच्या दानपात्रात आपल्या इच्छा शक्तीनुसार दान टाकतो. त्यामुळे सरासरी एक दिवसाला एक कोटीचे दान येथे येते. तसेच हार फुलेही वाहतात. परंतु आता यापुढे शिर्डीच्या साईमंदिरात भाविकांना फुलं हार प्रसाद नेण्यास साई संस्थानने बंदी घातली आहे. फुलं-हारांमुळे भाविकांची लुट होते तसेच मंदिरात अस्वच्छता निर्माण होते असा दावा करत विश्वस्त मंडळाने फुलं-हार बंदीचा ठराव पारित केला आहे.
या निर्णयाला शिर्डीतून फुलं विक्रेते, फुल उत्पादक शेतकऱ्यांकडून कडाडून विरोध होत आहे. याच पार्श्वभूमीवर मंदिरात भाविकांना पुजा सामुग्री नेऊ द्यावीत या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते संजय काळे यांनी अनोख आंदोलन छेडले आहे. कोपरगाव ते शिर्डी 18 किमी पायी चालत फुलांची टोपली घेऊन ते फुलं बाबांच्या द्वारकामाई समोर अर्पण करत मुख्य कार्यकारी अधिकारींच्या नावाने घोषणा दिल्या.
विशेष म्हणजे यात आंदोलनात फुल विक्रेते, उत्पादक शेतकरी यांनी सहभागी झाले होते. कोरोनाच्या दोन वर्षे आधी साईमंदिरात भाविकाना फुलं हार प्रसाद अशी पूजासामग्री नेण्यास तसेच समाधीवर चढवण्यास कोणतीही बंदी नव्हती. मात्र, साई संस्थानने अचानक बंदी घालण्याचा निर्णय घेतल्याने व्यावसायीकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. साई दर्शनाला येणारे भाविक फुलांचे हार, गुलाबाचे गुच्छ साईबाबांच्या चरणी अर्पण करत असतात. मात्र, कोरोनानंतर मंदिर भाविकांसाठी बंद झाले. तेव्हापासून मंदिरात फुले नेण्यास बंदी घालण्यात आली आहे.
कोरोना नियमात शिथिलता आली. पुन्हा भाविकांना साई मंदिरात दर्शनासाठी प्रवेश देण्यात आला. शिर्डीतील सर्व काही पूर्वपदावर आले. मात्र, साईबाबा समाधीवर फुले अर्पण करण्यास परवानगी देण्यात आली नाही. त्यामुळे फुले विक्रेते, प्रसाद व्यावसायिक अर्थिक अडचणीत सापडल्याचे सांगितले जात आहे. शिर्डी साईबाबा मंदिरात फुले अर्पण करण्यात येतात. त्यामुळे येथे फुलांची मोठी बाजारपेठ आहे. पंचक्रोशीत जवळपास शंभर एकरात फुलांची लागवड केली जाते. यात प्रामुख्याने लहान शेतकरी आहेत, जे दररोज फुले बाजारात आणून आपला उदरनिर्वाह करतात.
दररोज सकाळी फुलांचे लिलाव होऊन व्यावसायिक फुले विकत घेतात. त्याचे हार आणि गुच्छ बनवून ते भाविकांना विकले जातात. फुले विक्रेत्यांचा देखील मोठा व्यवसाय असून यावर फुल ओवणी करणाऱ्या, हार , गुच्छ विकणारे अशी अनेकांचे कुटूंब अवलंबून आहेत. एकमेकांवर अवलंबून असलेल्या छोट्या-मोठ्या व्यापाऱ्यांची मोठी साखळी येथे आहे. तर दुसरीकडे फुल-हार बंदीबाबत साई संस्थानने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. फुलं-माळांच्या निमित्ताने भाविकांच्या भावनांचा आधार घेत त्यांची लुट केली जात असल्याच्या अनेक तक्रारी संस्थानला प्राप्त झाल्या आहेत.
दोनशे रुपयांची फुलं माळ दोन हजारांना विकणे, यामुळे भाविकांची फसवणूक होत होती. तसेच समाधीवर चढवलेली फुले गर्दीत भाविकांच्या हातून मंदिरात पडत असल्याने ती पायदळी तुडवली जात. यामुळे एक प्रकारे फुलांचा चिखल तयार होत आहे. यामुळे अस्वच्छता होत असून सफाईसाठी अधिक वेळ लागतो आणि याचा परिणाम भाविकांच्या दर्शन वेळेवर होत असल्याने साई संस्थानच्या विश्वस्त मंडळाने फुलं हार बंदीचा ठराव करून अंमलात आणल्याचे साई संस्थानचे विश्वस्त डॉ. एकनाथ गोंदकर यांनी स्पष्ट केले आहे.
शिर्डीच्या साईबाबांनी आपले संपूर्ण जीवन फकीर अवस्थेत व्यतीत केले. भिक्षा मागून आपला उदरनिर्वाह केला. पण त्याच्या भक्तांनी त्यांना कुबेर स्वरुप बनवले आहे. साईबाबा मंदिरात दररोज हजारो भाविक येतात. सलग सुट्टीच्या दिवसात दोन ते तीन लाख भक्त साईबाबा समाधीचे दर्शन घेतात. कोरोना संकट काळात दोन वर्ष मंदिर भाविकांसाठी बंद राहीले होते. मात्र त्यानंतर मंदिर खुले झाल्यापासून भाविकांचा शिर्डीला येण्याचा ओघ पूर्वरत होताना दिसत आहे. परंतु आता संस्थांच्या या निर्णयामुळे तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
Shirdi Sai Baba Trust Big Decision for Darshan Devotees
Flower Fruits Garlands Sai Temple Ban