शिर्डी (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – श्री साईबाबा संस्थान मधील कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करण्याच्या प्रक्रियेला गती देण्याबाबत तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना महसूल, पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे- पाटील यांनी आज येथे दिल्या.
श्री साईबाबा संस्थान ट्रस्ट मधील कर्मचाऱ्यांना नियमित करण्यासंदर्भात विशेष बैठकीचे आयोजन शुक्रवारी मंत्रालयात आयोजित करण्यात आले होते. या बैठकीला खासदार सुजय विखे- पाटील, विधी व न्याय विभागाचे प्रधान सचिव नीरज धोटे, साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. सिवा शंकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहुल जाधव यांच्यासह संबंधित अधिकारी आणि संस्थान मधील कामगारांचे प्रतिनीधी उपस्थित होते.
श्री विखे- पाटील म्हणाले की, यापूर्वी संस्थानामध्ये कार्यरत असलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना नियमित सेवेमध्ये कायम करण्याचा धोरणात्मक निर्णय घेण्यात आला होता. त्याच धर्तीवर उर्वरीत कामगारांना सेवेत कायम करण्याबाबतचा प्रस्ताव शासनाकडे संस्थानने पाठविला आहे. यासाठी आवश्यक असेल ती प्रशासकीय बाबी तातडीने पूर्ण करणयाच्या सूचना त्यांनी विधी व न्याय विभागाच्या अधिकार्याना दिल्या.
कोविड काळात साईबाबा मंदिरात हार, फुले आणि प्रसाद नेण्यास सुरक्षेच्या कारणास्तव बंदी करण्यात आली होती. मात्र श्रींचे समाधी मंदिरात हार, फुले आणि प्रसाद न्यायला परवानगी मिळावी अशी मागणी होत आहे. त्यामुळे याबाबतही लवकरच निर्णय घ्यावेत. असे असेही विखे – पाटील यांनी बैठकी दरम्यान सूचित केले आहे.
Shirdi Sai Baba Temple Trust Contractual Employee
Ahmednagar Minister Radhakrishna Vikhe Patil